बीड जिल्ह्यातील लॉकडाऊन संदर्भात जिल्हाधिकारी करणार निर्णय जाहीर !

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा

 

बीड दि २३ मार्च, प्रतिनिधी

in article

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना लागू करत आहे मात्र नागरिक आणि व्यापारी त्याला प्रतिसाद देताना दिसत नाहीत. पर्यायाने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.त्यावर प्रशासनाने १० दिवस लॉकडाऊन करण्याच्या विचारात असल्याचे खात्रीलायक माहिती आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून त्यामध्ये प्रशासनाची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

गेल्या दोन दिवसापासून प्रशासनाच्या पातळीवर जिल्हाधिकारी राजेंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक आर राजा यांच्यात बैठका झाल्या असून यासंदर्भात ते उद्या भूमिका जाहीर करणार आहेत. दरम्यात संपूर्ण  लॉकडाऊन करणार का ? यामध्ये कसे निर्बंध असणार याबाबत उद्या जाहीर होणार आहे. संपूर्ण लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनास अटकाव होण्यास मदत होणार आहे.

आणखी वाचा :आजही कोरोनाचा आकडा सातशेच्या जवळ, ६११ रूग्णांना डिस्चार्ज

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here