शैक्षणिक सहलीतून बाल वैज्ञानिकांनी अनुभवली महाराष्ट्राची संस्कृती

 

 

in article

पुणे

Bal scientist pune tour मेट्रोमधून केलेली पुण्याची सफर…. विज्ञान उद्यानातील विविध खेळणी व उपकरणे यांच्या माध्यमातून अनुभवलेले विज्ञानाचे सिद्धांत…. अवकाश दर्शन… शिवसृष्टी मध्ये लेझर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन…..
अशा अनेक गोष्टी आज दिनांक 31 डिसेंबर 23 रोजी अनुभवत बाल वैज्ञानिक यांनी महाराष्ट्राची संस्कृती व पुण्याचे नयनरम्य दर्शन समजून घेतली आणि अनोख्या पद्धतीने सरत्या वर्षाला निरोप दिला…. निमित होतें राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी नंतर आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक सहलीचे….
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ५० वी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी उत्साहात संपन्न झाली. त्यानंतर राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीतील बाल वैज्ञानिक व देशभरातील मार्गदर्शक शिक्षक व अधिकारी यांच्यासाठी पुणे शहरातील ऐतिहासिक व आधुनिक स्थळांचे दर्शन घडाविण्यात आलें. त्यावेळीं बाल वैज्ञानिकांनी हा अनोखा अनुभव घेतला.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद सचिव प्रत्यूष मंडल, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे, सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक डॉ.कमलादेवी आवटे, डॉ.नेहा बेलसरे , डॉ. माधुरी सावरकर, डॉ. शोभा खंदारे, विज्ञान विभागाचे विभाग प्रमुख तेजस्विनी आळवेकर , रत्नप्रभा भालेराव आदी मान्यवर यानी शैक्षणिक सहली मध्ये सहभाग घेतला.नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील विज्ञान व गणित विषयाच्या विभाग प्रमुख सुनिता फरक्या ,नवी दिल्ली.येथील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद सचिव प्रत्यूष मंडल ,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे आदींनी यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
तत्पूर्वी काल सायंकाळच्या सत्रात वैज्ञानिक प्रदर्शनी मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्याचे नियोजन प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे अधिकारी डॉ . रत्ना गुजर यांनी केले.
विज्ञान प्रदर्शनाच्या प्रत्येक दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी पुढाकार घेतला आहे.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. शोभा खंदारे, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रभाकर क्षिरसागर, नामदेव शेंडकर, बाळकृष्ण वाटेकर आदींनी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात परिषदेतील विज्ञान विभागाने राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीतील शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले . परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेने समन्वय विभागाचे उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे उपसंचालक डॉ.राधा अतकरी, विज्ञान विभाग प्रमुख तेजस्विनी आळवेकर,अधिव्याख्याता मनीषा ताठे यांच्यासह राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील सर्व उपसंचालक, विभागप्रमुख, अधिव्याख्याता, विषय सहाय्यक व सर्व कर्मचारी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीच्या संयोजनासाठी पुढाकार घेतला. विविध वैज्ञानिक स्टॉल तसेच महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कलादालनाची मांडणी व उभारणीसाठी उपसंचालक डॉ.नेहा बेलसरे यांनी पुढाकार घेतला.
संपूर्ण शैक्षणिक सहलीतील वाहतुकीचे नियोजन परिषदेतील वाहतूक समितीमधील अधिकारी डॉ . दीपक माळी,चंदन कुलकर्णी व समितीमधील अन्य अधिकारी व कर्मचारी यांनी केले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here