सोयाबीन दुधाचा सर्व विभागाच्या पोषण आहारात समावेश करण्यासाठी प्रयत्नशील – कृषिमंत्री धनंजय मुंडे

soybean milk in poshan shakti abhiyan
soybean milk in poshan shakti abhiyan

 

मुंबई

in article

soybean milk in poshan shakti abhiyan सोयाबीन या पिकात शेतकऱ्याला आर्थिक आधार देऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची क्षमता आहे. त्यामुळे सोयाबीनचा सर्वसामावेशक वापर करण्याच्या अनुषंगाने धोरण ठरविण्यात येईल. तसेच छत्तीसगडच्या धर्तीवर सोयामिल्क सर्व विभागांच्या पोषण आहारात घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

soy milk सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि प्रक्रियादारांची गोलमेज परिषद कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

राज्याचे मुख्य सचिव डॉ नितीन करीर यांचा लोणीत सत्कार

यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफाॅर्मेशन (MITRA ) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी,कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक परिमल सिंह,मा. बाळासाहेब ठाकरे कृषीव्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर आणि soybean milk powder सोयाबीन प्रक्रियादाराचे प्रतिनिधी फूडचेनच्या चिन्मयी देऊळगावकर, चेतन भक्कड, अमोल धवन उपस्थित होते.

यावेळी श्री मुंडे म्हणाले, राज्यातील सोयाबीन soybean milk हे मुख्य पीक असून माफक दरात खाद्य तेल व प्रथिने उपलब्ध होतात. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना स्मार्ट प्रकल्पांतर्गत सीबीओ निवडीचे लक्षांक शिथील केलेले आहे. या विभागातील जिल्ह्यामधून शेतकरी उत्पादक कंपन्याचे सोयाबीन प्रक्रिया- सोयाबीन दूध, सोयाबीन टोफू, Solvent Extraction Plant इत्यादीचे प्रस्ताव सादर केल्यास प्रकल्पाच्या निकषाप्रमाणे मान्यता देण्यात येईल. सद्यस्थितीत सोयाबन दूध- दही- टोफू उत्पादन युनिट 100 किलो प्रती तास या मशनरीचे मापदंड 30 लाख रुपये आहे.सोयाबीन पीकांच्या प्रक्रिया केलेल्या पदार्थाला स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

यावेळी या गोलमेज परिषदेमध्ये soybean milk benefits सोयामिल्क छत्तीसगडच्या धर्तीवर सर्व विभागांच्या पोषण आहारात घ्यावे, पॅकेजिंग कॉस्ट खुप मोठी आहे त्यामुळे प्लास्टिक पाऊच आणि रेगुलर सप्लाय सुरु केला पाहिजे, जीएसटी 12 टक्के आहे त्याचा विचार व्हावा, अंडी दूध जसे पोषक आहे तसेच सोयाबीन पोषक तत्वानी भरपूर असल्यामुळे तसे मार्केटिंग व्हावे, सोशल मीडिया प्राचारक, आहारातज्ञ यांच्या मार्फत योग्य प्रसार व्हावा अशा अनेक विषयावर विचार विनिमय करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here