बीड जिल्ह्यातील’या’भागात आढळला मृत बिबट्या

बिबट्या मृत

 

अंमळनेर दि 24 ,प्रतिनिधी
अंमळनेर बीड रस्त्यावर महेंद्रवाडी शिवारातील विहीरीत बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना आज घडली.

in article

पाटोदा तालुक्यातील गारमाथा परिसरातील महेंद्रवाडी येथील विहीरीत बिबट्या मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला.हा भाग मयूर अभयारण्य क्षेत्रात येत आहे.
जुन्या महेंद्रवाडी येथिल पाणीपुरवठा विहीरीत हा ग्रमस्थांनी बिबट्या पहिल्यानंतर दोरीने वर काढण्यात आले.हे क्षेत्र मयुर अभयारण्यात येत असल्याने तेथील वनपरिक्षेत्र अधिकारी नायगाव घटनास्थळी दाखल झाले असून तालुका पशुवैद्यकीय अधिकारी बळीराम राख यांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.

पाणी पिण्यासाठी बहुदा हा बिबट्या गेला असावा असा कयास व्यक्त केला जात आहे.
आणखी वाचा :बीड जिल्ह्यात या तारखेपासून कडकडीत लॉकडाउन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here