आजही कोरोनाचा आकडा सातशेच्या जवळ, ६११ रूग्णांना डिस्चार्ज

४८४

 

 

in article

अहमदनगर: जिल्ह्यात आज ६११ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८० हजार ९८० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६९२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३९७८ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १६८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३६१ आणि अँटीजेन चाचणीत १६३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५६, अकोले ०७, जामखेड ०१, नगर ग्रामीण ०२, पाथर्डी ०७, राहाता २१, राहुरी ०२, संगमनेर ४७, श्रीरामपूर १७, कॅन्टोन्मेंट ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२३, अकोले ०७, जामखेड ०३, कर्जत ०६, कोपरगाव २५, नगर ग्रामीण २४, नेवासा ३७, पारनेर १४, पाथर्डी ०५, राहाता ४७, राहुरी ०५, संगमनेर १९, शेवगाव ०५, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर २९, कॅन्टोन्मेंट ०३ इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १६३ जण बाधित आढळुन आले. मनपा ४१,अकोले १४, जामखेड ०२, कर्जत १२, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण २१, नेवासा ११, पारनेर ०२, पाथर्डी २३, राहाता ०७, राहुरी ०७, शेवगाव ०५, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०९, इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

आणखी वाचा :जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा बहिष्कार 

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये ६११ रुग्णांचा समावेश आहे.
मनपा १९६, अकोले २५, जामखेड ०१, कर्जत १५, कोपर गाव ७३, नगर ग्रामीण ३०, नेवासा ०४, पारनेर २०, पाथर्डी २४, राहाता ८३, राहुरी ०७, संगमनेर ७५, शेवगाव ०२, श्रीगोंदा २१, श्रीरामपूर १३, कॅन्टोन्मेंट १६ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:८०९८०*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:३९७८*

*मृत्यू:११८९*

*एकूण रूग्ण संख्या:८६१४७*

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here