Diwali 2021,चिमुकल्यांनी लुटला आकाश कंदील बनविण्याचा आनंद!

Diwali 2021

 

 

in article

आष्टी, प्रतिनिधी

 

Diwali 2021,आकाश कंदील म्हणजे दिवाळीचे प्रतिक. दिवाळी आली कि घरोघरी आकाश कंदील लावण्याची लगबग सुरु असते, पण तो जर घरातील चिमुकल्यांनी तयार केलेला असेल तर मग सांगायलाच नको.

kindeel

अर्थात ते  बनविण्याचे  कौशल्य असायला हवे. आपल्याकडील कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न पारगाव जोगेश्वरी येथील शिक्षकांनी केलाय.

Diwali 2021

बीड जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या मुलांनी दिवाळी आकाश कंदील तयार करून घरच्या घरी आकाश कंदील कसे करायचे याचा पाठच शिकला.

Diwali 2021

आता हेच आकाश कंदील Diwali 2021,त्यांच्या घरावर लागतील आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरणार नाही.

Diwali 2021,बालकांनी केले अप्रतिम आकाश कंदील

आकाश कंदील विकत घेण्यासाठी गेल्यास १०० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत पैसे खर्च होतात. आणि आकाश कंदील घरासमोर लावणे हा मुलांचा हट्टही असतोच..हेच ओळखून या शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक सोमनाथ वाळके आणि त्यांचे सहकारी शिक्षक अण्णासाहेब घोडके यांनी शाळेतील मुलांना आकाश कंदील तयार करण्यास शिकवले.

kindeel

कागद कसा कापायचा यापासून ते आकाश कंदील चा प्रत्येक भाग  कापून कसा एकमेकांना जोडायचा? डिझाईन कशी तयार करायची, छोट्या आकाराचे आकाश कंदील कसे बनवायचे हे शिकवले.

आणखी वाचा :हिवरेबाजार येथील शाळेला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची 5 लक्ष रुपयांची मदत जाहीर

अगदी काही तासात मुलांनी आकाश कंदील तयार केले. आणि त्यांना स्व-निर्मितीचा आनंद मिळाला. भलेही दिवाळी आणखी काही दिवस लांब आहे, मात्र हे आकाश कंदील रोज रोज पाहून मुले मात्र हरखून जातील आणि दिवाळीच्या दिवशी आपण तयार केलेला आकाश कंदील दिमाखात लटकलेला  पुन्हा पुन्हा पाहून त्यांचा आनंद द्विगुणित होणार नक्कीच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here