हिवरेबाजार येथील शाळेला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची 5 लक्ष रुपयांची मदत जाहीर

हिवरेबाजार

 

अहमदनगर

in article

 हिवरेबाजार गावाचे जागतिक पटलावर कौतुक होत आहे. हा लौकिक टिकवतानाच तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज हिवरेबाजार येथे केले.

येथील विविध उपक्रमांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी गावकर्‍यांशी ग्राम संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, हिवरेबाजारच्या सरपंच विमल ठाणगे, उपवनसंरक्षक सुवर्णा माने याप्रसंगी उपस्थित होत्या.

 

हिवरेबाजार

 

हिवरेबाजार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना राजभवनवर येण्यासाठी निमंत्रित

यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले, शिकण्याचे कोणतेही वय नसतै त्यामुळे येथील ग्राम विकासाची कामे पाहून मलाही शिकायला मिळाले. गावकऱ्यांनी मेहनतीने कामे केली आहेत त्यामुळे हे आदर्श गाव झाले आहे. जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन जिल्हयात अजून आदर्श ग्राम विकसित करावेत अशी सूचना त्यांनी केली. ग्राम संवादाला उपस्थित असलेल्या  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना राजभवनवर येण्यासाठी निमंत्रित करतानाच शाळेला पाच लक्ष रुपयांची मदत राज्यपालांनी यावेळी जाहीर केली.

 

आणखी वाचा :राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी-शेती क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्याबरोबरच कृषी तंत्रज्ञान शिक्षण मराठी भाषेतून देण्याची गरज

 

पद्मश्री पोपटराव पवार यांनी प्रास्ताविकात गावामधे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी पदाधिकारी, गावकरी आणि शालेय विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे  येथील हेलीपॅडवर आगमन झाले. पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर गावाजवळील टेकडीवर करण्यात आलेल्या पाणी व्यवस्थापन प्रकल्पाची राज्यपालांनी पाहणी केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here