crop insurance,पीकविमा साठी किसान सभेची  संघर्ष दिंडी!

crop insurance,

 

 

in article

 

 

 

परळी वै:दि 29,प्रतिनिधी

 

   crop insurance,शेतकऱ्यांना खरीप पीक विमा तात्काळ मिळावा याकरिता अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने संघर्ष दिंडीला शुक्रवार दि 29 रोजी सिरसाळा येथून सुरुवात झाली.

शेतकऱ्यांच्या गगनभेदी घोषणा देत, हातातील लाल झेंड्यांनी सिरसाळा परिसर दिवाळीपूर्वीच उजळून निघाला.

सिरसाळा ते बीड सुमारे 80 किलोमीटर चालणाऱ्या या पायी पीकविमा संघर्ष दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतात कष्ट करणाऱ्या महिला शेतकरी उपस्थित होत्या.

 

 

खरीप २०२० चा पीक विमा crop insurance,बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळावा यासाठी अखिल भारतीय किसान सभेनी जुलै २०२१ ते आजतागायत परळी, बीड, पुणे व मुंबई या ठिकाणी विविध आंदोलनं केली.

शासनाने शेतकऱ्यांना वेळोवेळी विमा मिळेल असे अश्वासन दिले. सोबतच विमा कंपणीला निर्देश देऊन देखील, २०२१ संपत आलं तरी अद्याप २०२० चा विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.

त्यामुळे किसान सभा सिरसाळा ते बीड चार दिवस पीक विमा संघर्ष दिंडी (लॉंग मार्च) चा शुभारंभ शुक्रवार (ता.29) सिरसाळा येथुन झाला

शेतकऱ्यांना २०२० चा पिक विमा नाही, २०२१ च्या विम्याच्या पंचनाम्याचे गोंधळ, अतिवृष्टीमुळे जाहीर झालेली तुटपुंजी मदत आणि त्यातच बीड जिल्हयात दररोज  शेतकरी आत्महत्या होत आहेत.

केंद्र सरकार, राज्य सरकार व विमा कंपनी यांच्यातील दावे-प्रतिदाव्यात मात्र शेतकरी भरडला जात आहे.

यावर धोरणात्मक निर्णय होत नसल्याने तरुणांमध्ये प्रचंड रोष असून या वर्षी सरकार व विमा कंपनीने आमची दिवाळी हिरावून घेतलीय.

आता आम्हाला या वर्षीची दिवाळी सरकार दरबारी साजरी करू द्या अशी मागणी शेतकऱ्यांमधुन होत होती.

आणखी वाचा :Diwali 2021,चिमुकल्यांनी लुटला आकाश कंदील बनविण्याचा आनंद!

या मागणीला अनुसरूनच किसान सभेनी जिल्हाधिकारी, राज्याचे कृषी आयुक्त, बीड जिल्हयातील सर्व आमदार, खासदार, जिल्हयाचे पालकमंत्री, राज्याचे कृषीमंत्री, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांची भेट घेउन किसान सभेनी मागील चार महिन्या पासुन पीक विमा crop insurance,मिळावा यासाठी पाठपुरावा केलेला आहे. परंतु पिक विमा मिळालेला नाही.

२०२० चा २०२१ च्या पीक विम्या संदर्भात १७ सप्टेंबर २०२०च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना चे कलम २१.५ प्रमाणे स्थानीक आपत्तीमध्ये तात्काळ पिक वीमा मिळणे अपेक्षीत होते परंतु अद्यापही पंचनाम्याचा गोंधळ सुरू आहे.

त्यामुळे परळी तालुक्यातील सिरसाळा ते बीड असा 80 किलोमीटर  शेतकऱ्यांचा पीक विमा crop insurance,संघर्ष दिंडीस  (लॉंग मार्च) शुक्रवार (ता.२८) पासुन निघाला आहे.

crop insurance,अशी असणार संघर्ष दिंडी

सिरसाळा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातुन शुक्रवारी २९ ऑक्टोबर २०२१ रोजी  सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पुष्पहार घालून शेतकऱ्यांचा पिक विमा संघर्ष दिंडी (लॉंग मार्च) चालू झाला, पहिला मुक्काम तेलगाव येथे असून, शनिवार दि ३० ऑक्टोबर रोजी तेलगाव येथे माजलगाव व धारूर तालुक्यातील शेतकरी सोबत घेऊन संघर्ष दिंडी पुढे दुसरा मुक्काम वडवणी जवळील मैदा-पोखरी येथे मुक्काम व वडवणी तालुक्यातील आणि बीड तालुक्यातील शेतकरी सोबत घेत मार्गक्रमण करत ३१ तारखेला रात्री बीड जवळ येऊन थांबेल, १ नोव्हेंबर ला सकाळी तेथुन निघुन बीड येथील  जिल्हाधिकारी कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात जिल्हयातील शेतकरी मोठया संख्येनी उपस्थीत होतील.

सिरसाळा येथुन सुरू होणाऱ्या पायी संघर्ष दिंडीत किसान सभेचे कॉ अजय बुरांडे, कॉ दत्ता डाके, कॉ पांडुरंग राठोड, मुरलीधर नागरगोजे, कॉ मोहन लांब, कॉ रूस्तुम माने यांच्यासह शेकडो शेतकरी लाल झेंडा हातात घेउन मार्गक्रमण करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here