भंडारदरा परिक्रमा,पावसाळी पर्यटनाची उच्च अनुभूती

भंडारदरा

भंडारदरा परिक्रमा,पावसाळी पर्यटनाची उच्च अनुभूती

शांताराम काळे

.(पाऊसाळी पर्यटन)

अकोले

भंडारदरा.सह्याद्रीच्या कुशीत सुमारे साडेचार हजार फूट उंचीच्या पर्वतराजीच्या खोबणीत वसवलेला सुंदर जलाशय म्हणजेच विल्सन डॅम (भंडारदरा धरण). ब्रिटिशांनी १९१० मध्ये धरणाच्या बांधकामाला सुरवात केली आणि ते १९२६मध्ये पूर्ण झाले.

agro1 11p1

ब्रिटिशांनी धरणाची जागा निवडताना दाखविलेली रसिकता वाखाणण्याजोगी आहे. इथल्या पर्वतराजीमुळे परिसराला ‘प्रतिकाश्मीर’ म्हटले जाते. म्हणूनच या परिसरात पावसाळी सहलींसाठी पर्यटकांची गर्दी होते. धरणाची परिक्रमा करणे म्हणजे पर्यटनानंदाची उच्च अनुभूतीच!

akl15p2

in article

भंडारदरा धरणाच्या परिसरात दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा म्हणजे बालाघाट, राकट कातळाच्या पिंगट करड्या रंगाची ही डोंगररांग, ऋतुमानाप्रमाणेच तिचे सौंदर्यही बदलत जाते. कधी काळी थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटक इथे भ्रमंती करायचे. आता पावसाळी पर्यटनाचा आनंद येथे लुटला जातो.

akl12p3

पावसाळ्यापूर्वी काजवा महोत्सव सरता ग्रीष्म आणि वर्षाऋतूच्या आगमनाअगोदरच्या संधिऋतूत या परिसरातील सादडाची झाडे प्रकाशमान होतात. काजव्यांचे पुंजके इथल्या झाडांवर वास्तव्याला असतात. या काळात झाडांवर जणू चांदण्यांचे संमेलन भरल्याचा भास होतो. त्याला काजवा महोत्सवच म्हटले जाते. खरे तर लवकरच येणाऱ्या कृष्णजलदाच्या आगमनाची चाहूलच हे काजवे देतात. पावसाला सुरवात होताच त्यांचे जीवनचक्र संपते. वर्षाऋतूला सुरवात झाली, की इथल्या करड्या कातळाचा रंगही बदलू लागतो. संबंध डोंगरावर हिरवाईची शाल पसरू लागते. जसजसे पावसाचे प्रमाण वाढते, तसतसे या पर्वतरांगांचे सौंदर्य खुलू लागते. डोंगरापलीकडून येणारे कृष्णमेघही या उत्तुंग शिखरांवर विसावतात. रेंगाळणाऱ्या मेघांमध्ये शिखरे, डोंगरवाटा लुप्त होतात. मेघदुलई बाजूला होताच डोंगरांच्या घळीतून कोसळणारे शुभ्र फेसाळ धबधबे नजरेस पडतात.

लोभस ‘अम्ब्रेला फॉल’

akl29p2

भंडारदरा धरणाच्या अलीकडे १० किलोमीटरवर रंधा धबधब्याचे दर्शन घडायचे; मात्र आता कोदणी जलविद्युतप्रकल्पासाठी पाणी अडविल्याने हा धबधबा आकसल्यासारखा कोसळतो. त्यामुळे हल्ली धबधबा पाहायला मिळणे म्हणजे या भागातील पर्यटनातला अलभ्य लाभच ! भंडारदरा धरण भरले, की अतिरिक्त पाण्याचा विसर्ग धरणाच्या भिंतीलगतच्या अर्धगोलाकार खडकावरून सोडला जातो. फेसाळणाऱ्या या धवलधारा छत्रीसारखा आकार धारण करत वाहू लागतात. म्हणूनच त्याचे नाव ‘अम्ब्रेला फॉल’ ठेवण्यात आले. या धबधब्याखाली एक छोटेखानी पूल आहे. पर्यटकांना या पुलावर जाऊन ‘तुषारस्नान घेता येते. त्यामुळे ‘अम्ब्रेला फॉल’ लोभस झाला आहे. इथेही ब्रिटिशांच्या रसिकतेला दाद द्यावीशी

महाराष्ट्राची चेरापुंजी..

भंडारदरा ,परिक्रमेला धरणाच्या उजव्या बाजूच्या रस्त्याने सुरवात करता येते. या भागातला प्रवास सुरू होतो, तसतसा निसर्ग आपल्याला कुशीत सामावून घेऊ लागतो. जलाशयाच्या बाजूने वळणे घेत घेत प्रवास करताना समोरच्या डोंगरकड्यांवरून घरंगळणारे मेघ, संततधार पाऊस, मेघांच्या दाट दुलईत अदृश्य होणारा रस्ता पार करताना आपसूकच ‘ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा..’ या ओळी ओठांवर येतात.

akl29p1राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपातर्फे संजय उपाध्याय यांचा अर्ज दाखल

रतनगडाच्या डोंगरमाथ्यावरीलएका गुहेत प्रवरा नदीचा उगम आहे. धरणापासून साधारण सात किलोमीटर आत गेल्यानंतर पांजरे नावाचे छोटेखानी गाव आहे. येथून कळसूबाई शिखराचे दर्शन घडते. ‘महाराष्ट्राचा एव्हरेस्ट’ मानल्या जाणाऱ्या कळसूबाईची चढाई येथून किंवा पलीकडच्या बारी गावातून सुरू करता येते. पांजरे येथून पुढे घाटघरकडे जाता येते. पांजरे, घाटघर ही गावे महाराष्ट्रातील चेरापुंजी मानली जातात.

akl15p2

एकदा पाऊस सुरू झाला, की चार-सहा दिवस अविश्रांत कोसळणे ठरलेलेच. घाटघरच्या कोकणकड्यावर उभे राहून खाली डोकावले, की खोल दरीतला उदंचन जलविद्युत प्रकल्प ला नजरेत भरतो. एका बाजूला छातीत ने धडकी भरविणारा कोकणकडा, वेगाने रोरावणाऱ्या वाऱ्याचा नाद पर्यटकांना वर्ग भुरळ घालतो. घाटघरच्या घाटणदेवी ऊ मंदिर परिसरातून दिसणारा सूर्यास्तही णे डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो.

IMG 20210611 WA0264 1

, साम्रदची सांदण..

घाटघरहून साम्रदमार्गे रतनवाडीकडे र जाताना साधारण एक किलोमीटर आडवाटेला सांदण आहे. पावसाचे  तडाखे वर्षानुवर्षे झेलल्याने खडकावर आकाराला आलेल्या नानाविध रचना, कोकणकड्याचे रौद्र रूप

कधी साहसाला साद घालणारे सुळके, तर कधी रांजणखळगे… अशा अनेक नैसर्गिक कलाकृती येथे साकारल्या आहेत. एक किलोमीटर लांबीच्या सांदणीची रुंदी साधारण ५० फूट आहे. रतनगडाच्या डोंगरातून येणारा ओढा या सांदणीतून वाहतो. त्यातील मोठमोठ्या शिळा साहसी पर्यटकांना साद घालतात. अर्थात, पावसाळ्यात या सांदणीत उतरणे धोक्याचे असते. अचानक पूर आला, तर आसरा घेण्यास सांदणीमध्ये जागा नाही.

भंडारदरा ,पायथ्याला न येणारे धबधबे – मुतखेल मार्गे परिक्रमा,पावसाळी पर्यटनाची उच्च अनुभूतीधरणाजवळ पुन्हा पोचता येते. या ठिकाणी आपली धरण परिक्रमा पूर्ण होते. या सर्व प्रवासात मुतखेलजवळच्या डोंगरमाथ्यावरून पडणारे धबधबे पायथ्याशी न पोचता वाऱ्यामुळे हवेतच विरतानाचे दृश्य पर्यटकांना थाबण्यास भाग पाडतातच. या नागमोडी वळणांच्या प्रवासात काही ठिकाणी एकमेकांना बिलगून उभी असलेली कौलारू घरे इथिल्या आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवतात. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here