साईबाबा संस्थान :नवनियुक्त विश्वस्त मंडळाला उच्च न्यायालयाची स्थगिती

साईबाबा संस्थान

अहमदनगर- प्रतिनिधी

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाला उच्च न्यायालयाने अवघ्या पाच दिवसांतच स्थगिती दिली आहे.

in article

विश्वस्त मंडळाशी संबंधित प्रकरण न्यायालयात सुरू असताना न्यायालयाला अवगत न करता नव्या मंडळाने सूत्रे कशी स्वीकारली? अशी विचारणा न्यायालयाने केली असून यावर २३ सप्टेंबरला म्हणने सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यातील सरकारने विश्वस्त मंडळ जाहीर करताना आ.आशुतोष काळे यांची अध्यक्षपदी निवड केली. मात्र आता न्यायालयीन निर्णयावर या विश्वस्थांचे भवितव्य अवलंबून आहे.

आणखी वाचा : ९५१ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६५२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

साईबाबा संस्थान संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार 23 सप्टेंबरपर्यंत कोणताही निर्णय घेता येणार नाही.

महत्वाची बाब म्हणजे न्यायालयाच्या परवानगीनंतरच सरकारने नियुक्त केलेल्या विश्वस्त मंडळाला धोरणात्मक निर्णय घेता येणार आहे. गेल्या दोन वर्षापासून साई संस्थानचा कारभार तदर्थ समितीकडे होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here