अ जाती जमातीचे राष्ट्रीय मंत्री वैभव पिचड यांची नियुक्ती

खूणगाठ

अनुसूचित जाती जमातीचे राष्ट्रीय मंत्री पदी माजी आमदार वैभव पिचड यांची नियुक्ती

अकोले दि 3 प्रतिनिधी

भाजपच्या राष्ट्रीय मंत्री पदी महाराष्ट्रातून एकमेव माजी आमदार वैभव पिचड यांची नियुक्ती करण्यात आली आहे .त्या संबंधीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष राज्यसभा खासदार समीर उरावं यांनी माजी आमदार वैभव पिचड यांना दिले आहे . तसेच दूरध्वनीवरून माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .गेली वर्षभरात महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या प्रश्नावर आवाज उठवून सरकारला धारेवर धरून खावटी कर्ज,रोजगार,रेशन, नरेगा मार्फत रोजगार,आदिवासी संघटन,वीज बिल,ऑनलाईन शिक्षण,आदिवासींचा कुपोषण,पोषण आहार,वन जमिनी प्रश्न,शेतीला पाणी ,उपसासिंच न योजना,आरक्षण,या विविध प्रश्नावर सडेतोड मत व्यक्त करत सरकारला हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाग पाडले .त्यांच्या कामाची दखल घेऊन राष्ट्रीय भाजप नेत्यांनी दखल घेऊन महाराष्ट्रातून त्यांच्या कामाचा अहवाल घेऊन त्यांची राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या निवडीबद्दल राज्यातील आदिवासी विकास परिषदेने त्यांचे अभिनंदन केले असून राष्ट्रीय पातळीवर त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे युवा राज्य अध्यक्ष लकी जाधव यांनी सांगितले आहे .राज्य भाजपने माजी आमदार यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्यावर राज्यात अजून मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे वृत्त असल्याने अकोले तालुक्यात फटाके फोडू न त्यांचे स्वागत करण्यात आले

in article

आणखी वाचा:सीना नदीपात्रातून वाळू उपसा करणारे 2 जेसीबी 4 ट्रॅक्टर जप्त ; पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कामगिरी

 केंद्रीय नेत्यांनी व राज्य नेतृत्वाने माझ्यावर
 विश्वास टाकून देश पातळीवर काम करण्याची मोठी
 संधी दिली असून लवकरच राष्ट्रीय व राज्य 
पातळीवर सर्व अनुसूचित जमातीचा एकत्र मेळावा
 घेऊन दिलेल्या जबाबदारीचा शुभारंभ करणार 
असल्याचे वैभव पिचड यांनी बोलताना सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here