सीना नदीपात्रातून वाळू उपसा करणारे 2 जेसीबी 4 ट्रॅक्टर जप्त ; पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कामगिरी

वाळू उपसा

सीना नदीपात्रातून वाळू उपसा करणारे 2 जेसीबी 4 ट्रॅक्टर जप्त ; पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कामगिरी

आष्टी दि 2 फेब्रुवारी, प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील अनधिकृत वाळू उपसा करत असलेल्या नागरिकांना पायबंद घालण्यासाठी बीड पोलिसांनी कंबर कसली आहे. आष्टी तालुक्यातील सीना नदी पात्रात अनधिकृत वाळू उपसा करत असलेले ट्रॅक्टर आणि जेसीबी टाकळसिंग येथे पोलिसांनी जप्त केले.  12 जणांविरुद्ध आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड पोलिसांच्या विशेष पथकाने केली आहे.

in article

बीड पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास हजारे यांच्या पथकाने  ही कारवाई केली आहे. यामध्ये 4 ट्रॅक्टर दोन जेसीपी पोलिसांनी जप्त केले असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.यातील दोन आरोपी फरार आहेत तर सहा वाहन मालक अशा एकूण बारा जणांविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती या पथकाचे प्रमुख विलास हजारे यांनी दिली.
आष्टी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सीना नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर बीड पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने या टाकळसिंग जवळच्या सीना नदी पात्रात  छापा टाकून दोन जेसीबी आणि चार ट्रॅक्टर जप्त केले आहे.
यामध्ये बाळू तुकाराम देवकते, सुभाष बाळासाहेब वाल्हेकर,श्रीराम ज्ञानदेव जगताप,गणेश सुनील श्रीगंधे, यांच्यावर आष्टी पोलिसांत विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आली आहेत.या पथकाने 4 ट्रॅक्टर 3 ब्रास वाळू  किमंत 2445000 रुपये ,आणि 2 जेसीबी किंमत 23 लाख असा एकूण 4745000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

आणखी वाचा:केंद्रीय अर्थसंकल्प 2021-2022 चे वैशिष्ट्ये

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here