छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यातल्या सर्वांत उंच पुतळ्याचं रत्नागिरीत लोकार्पण

tallest statue chhatrapati sambhaji maharaj,
tallest statue chhatrapati sambhaji maharaj,

 

रत्नागिरी ,

in article

tallest statue chhatrapati sambhaji maharaj, छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यातल्या सर्वांत उंच highest statue पूर्णाकृती पुतळ्याचं आज (४ फेब्रुवारी) रात्री पावणेआठ वाजता रत्नागिरीत लोकार्पण करण्यात आलं.

रत्नागिरी शहरातल्या थिबा राजवाड्याजवळच्या राजमाता जिजामाता उद्यानात उभारण्यात आलेल्या या पुतळ्याच्या अनावरणाआधी बालशिवाजी आणि राजमाता जिजामाता यांच्या पुतळ्यांचंही अनावरण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं.

मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टने साकारलेल्या संभाजी महाराजांच्या या पुतळ्याचा पाया ३५ फूट उंचीचा असून, पुतळ्याची एकूण उंची ५६ फूट आहे. पुतळ्याच्या उभारणीसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च आला आहे.

ratnagiri news, नगरपालिकेच्या उद्यानात हा पुतळा अशा ठिकाणी उभारण्यात आला आहे, की जिथून खालच्या बाजूला पाहिल्यास काजळी नदी अरबी समुद्राला मिळते त्या भाट्ये खाडीचं विहंगम दृश्य दिसतं.

या वेळी पालकमंत्री म्हणाले, की ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज chhatrapati sambhaji maharaj, यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत हा पुतळा उभारताना आनंद होत आहे. ३१ फूट उंचीच्या विठ्ठलमूर्तीचंही रत्नागिरीत उद्या लोकार्पण होणार असून, दानशूर भागोजीशेठ कीर यांचा पुतळाही काही महिन्यांत रत्नागिरीत साकारला जाणार आहे. त्यामुळे रत्नागिरीला ‘सिटी ऑफ स्टॅच्यू’ करण्यात यश मिळालं आहे. पुढच्या पिढीला महनीय व्यक्तींच्या अभ्यासासाठी याचा उपयोग होईल.’ पर्यटनवाढीसाठीही या उपक्रमाचा उपयोग होणार आहे.

पुतळ्याच्या लोकार्पणानंतर आकर्षक विद्युत रोषणाई आणि आतषबाजीने परिसर उजळून गेला होता. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी , रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्यधिकारी तुषार बाबर, गायक स्वप्नील बांदोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी गायनाचा कार्यक्रम सादर झाला, तसंच ढोल-ताशे-हलगी-तुतारी आदी वाद्यांचं वादनही करण्यात आलं. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here