मराठा आरक्षण विधान सभेत मागा- पंकजा मुंडे

आष्टी

Pankaja munde on maratha arkashan मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मुख्यमंत्री आणि विधानसभेचा मुद्दा आहे.मुख्यमंत्री यांनी या संदर्भात शब्द दिला असून हे आरक्षण विधान सभेत मागा असे भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी सांगितले.

in article

बीड जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज उंदरखेल येथे जाहीर सभा घेतली.यावेळी विधान परिषद सदस्य सुरेश धस उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाचा हा विधान सभेतील मुद्दा असून ते आरक्षण विधान सभेच्या निवडणूकीत आरक्षण मागा असे सांगून  मुख्यमंत्री त्यानी आरक्षणाचा शब्द दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने विधानसभेच्या सदस्याने ठराव करायचा, अध्यादेश काढायचा, मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा, कॅबिनेटमध्ये तो निर्णय जाहीर करायचा आणि तो कोर्टात टिकवायचा हे त्यांचे कर्तव्य आहे, इथं बाता मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नसतं असे म्हणत पंकजा मुंडे यांनी आरक्षणावरून मोठे वक्तव्य केले.
पंकजा मुंडे यांनी नाव न घेता मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here