Homeताज्या बातम्यामी दिलेला राजीनामा मंजूर होईपर्यंत कामे करणार

मी दिलेला राजीनामा मंजूर होईपर्यंत कामे करणार

मी दिलेला राजीनामा मंजूर होईपर्यंत कामे करणार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

नाशिक-

Nashik chhagan bhujbal minister resignation ओबीसीं संदर्भात अंबड येथे 16 नोव्हेंबरला जाण्यापूर्वीच मी मंत्रीपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला होता त्यांनी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मी त्याची वाच्यता केली नव्हती मात्र मी राजीनामा दिला असून जोपर्यंत तो मंजूर होत नाही तोपर्यंत मी माझी जबाबदारी म्हणून मंत्रीपदाचे कामकाज करीत आहे, असे प्रतिपादन ओबीसींचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे केलं.

आणखी वाचा :🎯✅

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी कायमस्वरुपी निधी उपलब्ध करुन देणार

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना भुजबळ यांनी सांगितले की, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे मी राजीनामाच्या
वाच्यता केली नव्हती. मात्र, काही लोक मंत्रिमंडळातून काढण्याची मागणी करत असल्यामुळे त्यांच्यासाठी राजीनाम्याबाबत सांगितले. मला मंत्री मंडळातुन बाहेर काढण्याची मागणी करणारे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्यास ते आपला राजीनामा लवकर मंजूर करतील असे टोलाही भुजबळ यांनी लगावला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments