लॉकडाउनला आमदार सुरेश धस यांचा विरोध;सामान्य नागरिक भरडले जाणार

कोविड लस

लाॕकडाऊन हा पर्याय नसून यामुळे सर्वसामान्य भरडला जाईल – आ.सुरेश धस

आष्टी दि 24 मार्च ,प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे हे जरी खरे असले तरी संपूर्णपणे जिल्हाबंद करुन लाॕकडाऊन करणे हा पर्याय असू शकत नाही या लाॕकडाऊनमुळे सर्वसामान्य माणूस भरडला जाणार असून या लाॕकडाऊनला आपला विरोध असल्याचे आ.सुरेश धस यांनी प्रसिद्धीपञकाद्वारे सांगितले आहे.
ज्या ठिकाणी रुग्णसंख्या असेल त्या ठिकाणी कंटेनमेंन्ट झोन करुन ती गल्ली अथवा काॕलनी बंद करणे गैर नाही माञ लाॕकडाऊन करुन नेमके काय साध्य होईल हा हि एक मोठा संशोधनाचा विषय आहे.आधीच सर्वसामान्य माणूस मागील लाॕकडाऊनच्या काळात भरडला गेला.यामध्ये सर्वच स्तरातील छोट्यामोठ्या व्यावसायिकांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले.अनेकांना नाहक ञास देखील सहन करावा लागला.त्यानंतर हा घटक आत्ता कुठेतरी पुर्व पदावर येत असल्याचे चिञ दिसत असताना पुन्हा एकदा लाॕकडाऊनच्या नावाखाली सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत करण्याचा हा प्रकार असून वाढत्या कोरोनावर प्रशासनाने नियंञण आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे परंतु लाॕकडाऊन हा पर्याय असू शकत नाही त्यामुळे या लाॕकडाऊनच्या निर्णयाला माझा विरोध असल्याचेही आ.सुरेश धस म्हणाले.

आणखी वाचा जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होणार

in article

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here