प्रशासनाच्या विरोधात आमदार सुरेश धस यांचा कायदेभंग

कायदेभंग

प्रशासनाच्या विरोधात आमदार सुरेश धस यांचा कायदेभंग

आष्टी दि 25 मार्च,प्रतिनिधी

बीड जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संपूर्ण टाळेबंदीचा आदेश दिल्यानंतर आमदार सुरेश धस यांच्यासह व्यापाऱ्यांनी या टाळेबंदीला विरोध केला असून या संदर्भातील निवेदन तहसीलदार राजाभाऊ कदम यांना देण्यात आले.

in article

आज व्यापाऱ्यासह आमदार सुरेश धस यांनी आष्टी तहसिलदार यांना निवेदन दिले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की,सविनय कायदेभंगाचे गुन्हे दाखल झाले तरी व्यापारी लाॕकडाऊन मध्ये सहभाग घेणार नाहीत.व्यापा-यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदनिशी उभा असून वेळप्रसंगी माझ्यावरही वेगवेगळे गुन्हे दाखल करा गुन्ह्यांची मला सवय असल्याचे आ.सुरेश धस यांनी यावेळी सांगितले.

आणखी वाचा: लॉकडाउनला आमदार सुरेश धस यांचा विरोध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here