Smriti Mandhana:ऐतिहासिक शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला.

Smriti Mandhana

Smriti Mandhana:स्मृती मानधना ऐतिहासिक शतक ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी तसेच गुलाबी चेंडूवर शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला.

दुसऱ्या दिवसाचा ही खेळ पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही

in article

क्वीन्सलँड(गौरव डेंगळे,१/१०)

Smriti Mandhana:क्वीन्सलँडच्या मेट्रिकॉन स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुलाबी चेंडू कसोटीत सलामीवीर स्मृती स्मृती मानधना ने आपले पहिले शतक झळकावल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट Indian women’s cricket team संघाचा दुसरा दिवस २७६/५ ला संपला.

आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा आपल्या शतकासाठी २० धावांची आवश्यकता होती.

सकाळच्या सत्रात सावध सुरुवात करत मंधानाने भारतासाठी ऑस्ट्रेलियन भूमीत पहिले शतक पूर्ण केले.

दुसऱ्या विकेटसाठी तिच्यात व पूनम राऊत यांच्यात १०२ धावांची भागीदारी झाली.

२१६ चेंडूत १२७ धावांची शानदार खेळी केल्यानंतर स्मृती मानधना ला शलेग गार्डनरने बाद केले.

स्मृती मानधना बाद झाल्यानंतर पूनम राऊतला ३६ धावावर सोपनीने बाद केले व त्यावेळी भारतीय महीला संघाची धावसंख्या होती ३ बाद २१७.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार मिताली राज व येष्टिका भाटिया यांच्यात ४४ धावांची भागीदारी झाली.

येष्टिकाला १९ धावांवर पेरीने बाद केले.३० धावांवर कर्णधार मिताली राज धावबाद झाली. पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताची दीप्ति शर्मा १२ धावांवर तर तनिया भटिया ०० धावांवर मैदानात नाबाद होत्या.

दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने १०१.५ षटकात ५ बाद २७६ धावा काढल्या आहेत.

आणखी वाचा : Gandhi jayanti special 2021:गांधीजींच्या विचारांची स्मृती जपवणूक करणारे गाव

Smriti Mandhana:स्मृती मानधना

धावफलक : भारतीय महीला पहिला डाव ५/२७६ (स्मृती मंधाना १२७,पूनम राऊत ३६, सोपणी मोलिनेक्स २/२८)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here