Nitin gadkari:नगर-जामखेड रस्त्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण पण,कडा-आष्टी रस्त्याची बीडच्या खासदारांची जबाबदारी

Nitin gadkari

Nitin gadkari:नगर-जामखेड रस्त्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण पण,कडा- आष्टी रस्त्याची बीडच्या खासदारांची जबाबदारी

नगर-प्रतिनिधी

in article

Nitin gadkari: केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे उद्या नगर- कडा-आष्टी- जामखेड रस्त्याचे लोकार्पण करणार आहेत.
संपूर्ण रस्त्यांपैकी फक्त ५१ किमी अंतराच्या रस्त्याचे लोकार्पण केले जाणार असल्याचे खासदार सुजय विखे यांनी सांगितले.

मात्र साबलखेड ते आष्टी पर्यंतच्या रस्ताची जबाबदारी ही बीडच्या खासदार यांची असल्याचे त्यांनी सांगितले.

Nitin gadkari:केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अहमदनगर- कडा- आष्टी – जामखेड या रस्त्याचे लोकार्पण होत आहे.

एकूण लांबीच्या रस्त्यांपैकी फक्त ५१ किमी लांबीचा रस्ता करण्यात आला. उर्वरित 17 किमी लांबीचा रस्ता सोडून देण्यात आला.

याबाबत खासदार विखे यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि, बीड जिल्ह्यातील रस्त्यांची जबाबदारी ही तेथील खासदार यांची आहे. मी माझ्या जिल्ह्यातील रस्ता केला आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना विचारा असेही त्यांनी सांगितले.

राज्य मार्ग ५६१ हा राष्ट्रीय महामार्ग कडे वर्ग केल्यानंतर ५१ किमी अंतराच्या रस्त्याला मंजुरी मिळाली. मात्र हा रस्ता सलग न करता नगरच्या बाजूने काही किमी आणि जामखेडच्या बाजूने काही किमी करण्यात आला.

हा राष्ट्रीय मार्ग असून असा भेदभाव का असा प्रश्न विचारला जात आहे.

Nitin gadkari: या रस्त्याचा वाली कोण ?

सध्या या 17 किमी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभाग काही करायला तयार नाही.

दररोज अनेक वाहनांचे नुकसान आणि नागरिकांचे अपघात होत आहेत.

मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही. यासंदर्भात कडा येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनही करण्यात आले होते मात्र आश्वासनाची बोळवण करण्यात आली.

या रस्त्याचा प्रश्न नेमका सोडविणार कोण हा प्रश्न आहे?

आणखी वाचा:Gandhi jayanti special 2021:गांधीजींच्या विचारांची स्मृती जपवणूक करणारे गाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here