इतने कम समय में इतनी अच्छी पेंटिंग कैसी बनायी?

0
32
Shivkumar sharma tribute

Shivkumar sharma tribute इतने कम समय में इतनी अच्छी पेंटिंग कैसी बनायी?

अहमदनगर

in article

Shivkumar sharma tribute इतने कम समय में इतनी अच्छी पेंटिंग कैसी बनायी?
हे वाक्य प्रसिद्ध संतूर वादक शिवकुमार शर्मा यांचे ….

प्रसिद्ध चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणी जागविल्या.
‘संतूर’ या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे जगद्विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे निधन झाले आहे.

सिलसिला या चित्रपटाला बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बरोबर त्यांनी दिलेले संगीत रसिकांच्या सतत आठवणीत राहणारे ठरले आहे.

कला क्षेत्रात काम करताना ज्या दिग्गजांचा सहवास लाभला त्यात पंडित शिवकुमार शर्मा होते.

.Avinash sable बीडच्या अविनाश साबळे ने 30 वर्षापूर्वीचे अमेरिकेतील रेकोर्ड मोडले

Shivkumar sharma tribute

अहमदनगर येथे एका कार्यक्रमानिमित्त ते आले होते. त्यांचे संतूरवादन चालू असताना मी स्टेजवरच त्यांचे लाईव्ह पेंटिंग काढले.

कानात समधुर संतूर गुंजत असताना माझे हात पेटिंग करीत होते. एका विलक्षण अवस्थेत मी ते पेंटिंग पूर्ण केले.

मैफील संपल्यानंतर मी ते पेंटिंग पंडितजींना दाखवले. पेंटिंग पाहताक्षणीच त्यांच्या चेहर्‍यावर आश्चर्याचे भाव उमटले.

ते मला म्हणाले की, इतने कम समय में इतनी अच्छी पेंटिंग कैसी बनायी? बहोतही बढीया किया है आपने’’ त्यांच्या स्तुतीपर शब्दांनी मी भारावून गेलो होतो.

मी म्हणालो की, ‘‘ये तो आपके संगीतकीही जादू है, जिसे सुनते हुये मैं अपने काम में खो गया. आपके सुरोंका कमाल हमने सिलसिला के संगीत में महसूस किया है. संतूर और बासरी का इतना अनोखा संगम आपने और पंडित हरिप्रसाद चौरसिया जीने दिखाया है. हम आपसेही कलाकार कैसा होना चाहिए ये सिखते है’’ त्यांनी हसून मान डोलावत मला त्या पेटिंगवर आपली स्वाक्षरी दिली.

 

Shivkumar sharma

ते अतिशय दिलखुलास व्यक्तीमत्त्व होते. स्वत: कलाकार असल्याने कलेची पारख त्यांच्यात होती. त्यांनी संतूर वादन काय असते हे जगाला दाखवून दिले.

इतक्या महान कलाकाराशी संवाद साधण्याची, त्यांच्याकडून पाठीवर शाबासकीची थाप मिळवण्याची पात्रता मी कमावली ही भाग्याचीच गोष्ट आहे.

आज शिवकुमार शर्मा ईहलोक सोडून गेले असले तरी त्यांचे संतूर सूर कायम मनात रूंजी घालत राहतील.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here