चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांना नेपाळचा लुंबिनी वर्ल्ड पीस सन्मान  जाहीर

प्रमोद कांबळे
प्रमोद कांबळे

अहमदनगर

अहमदनगर येथील चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांना नेपाळचा लुंबिनी वर्ल्ड पीस सन्मान  जाहीर झाला आहे .

in article

येत्या बुद्ध जयंतीच्या दिवशी गौतम बुद्धांच्या जन्म स्थानी नेपाळ मधील लुम्बिनी येथे प्रदान करण्यात येणार आहे.

नेपाळ येथील लुंबिनी पीस फाउंडेशन च्या वतीने  लुंबिनी वर्ल्ड पीस सन्मान 2022 हा पुरस्कार अहमदनगर येथील शिल्पकार प्रमोद कांबळे प्रदान केला जाणार असल्याची माहिती वर्ल्ड पीस फोरमचे बासू गौतम यांनी दिली.

कांबळे यांच्यासह प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला यांनाही सन्मानित केले जाणार आहे.प्रमोद कांबळे हे दरवर्षी इको फ्रेंडली गणेशाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक गणेशाचे जनजागृती करत असल्याने त्यांना हा सन्मान जाहीर झाला आहे.

याच कार्यक्रमामध्ये जझिरा एअर लाईन्स चे चेतन राज यांचाही  या पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे लुम्बिनी वर्ल्ड पीस फोरम नेपाळ यांच्या वतीने विविध माध्यमातील आंतरराष्ट्रीय प्रसिध्द व्यक्तींचा  सन्मान केला जातो.

जगविख्यात शिल्प चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी आपल्या कलेच्या  माध्यमातून  आपला वेगळा ठसा उमठवला आहे.

त्यांना यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

इतने कम समय में इतनी अच्छी पेंटिंग कैसी बनायी?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here