खाजगी डॉक्टर्सची काही तास सेवा उपलब्ध करू – ना. मुंडे

खाजगी डॉक्टर्सची

डॉक्टर्सची कमी असेल तर खाजगी डॉक्टर्सची काही तास सेवा उपलब्ध करू – ना. मुंडे

परळी दि. 03,प्रतिनिधी
रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेत कोणताही रुग्ण सिरीयस होण्याआधी इथेच योग्य उपचार मिळावेत, यासाठी गरज भासल्यास परळीतील खाजगी डॉक्टर्सची काही तासांसाठी सेवा उपलब्ध करून घेऊ असे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

in article

रळी येथील ग्रामीण रुग्णालयात आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते 50 ऑक्सिजन बेडच्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. येथे आजपासून 25 ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्यात आले असून, आणखी 25 बेडला ऑक्सिजन सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधासभा पोट निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव 

ना. धनंजय मुंडे यांनी यावेळी वॉर्डांमध्ये जाऊन उपलब्ध सुविधांची पाहणी केली.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुर्मे, डॉ. हर्षद शेख, पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाये, तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण मोरे, नायब तहसीलदार रुपनर यांसह आदी उपस्थित होते.

रुग्णालयात 50 रुग्णांना एकाच वेळी सेवा देण्याच्या प्रमाणात पॅरा मेडिकल स्टाफ उपलब्ध करण्यात आला आहे, त्यांना आवश्यक सामग्री, पीपीई किट व अन्य साहित्याची कमतरता भासणार नाही, याची काळजी घ्यावी; असे निर्देश डॉ. गित्ते यांना दिले.तर रुग्णालयात आजपासून 25 रुग्ण दाखल होतील त्यांच्या नातेवाईकांची गर्दी होऊ नये यासह अन्य सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश ना.मुंडे यांनी यावेळी पोलीस उपअधीक्षक जायभाये यांना दिले. तसेच सर्व डॉक्टर्स, पॅरा मेडिकल स्टाफ व अन्य कर्मचाऱ्यांना सेवा कार्यासाठी ना.मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here