एकत्र येऊन आयोजित रक्तदान शिबिरात महिलांचा सहभाग

रक्तदान शिबिरात महिलांचा सहभाग

पाथर्डी रक्तदान शिबिरात महिलांचा सहभाग

पाथर्डी दि 2 मे प्रतिनिधी

in article

पाथर्डी येथील विविध मंडळांनी एकत्र येऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले.या रक्तदान शिबिरात महिलांनी मोठा सहभाग नोंदविला.
पाथर्डी येथील श्रीराम मित्र मंडळ,आधार सेवाभावी संस्था,गोल्डन ग्रुप, स्वामी विवेकानंद हेल्थ सेंटर हिन्दू युवा रक्षा मंच,  जगदंब युवा प्रतिष्ठान, श्री माहेश्वरी श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट,सुवर्णयुग तरुण मंडळ पाथर्डी यांच्या सयुक्त विद्यमाने माहेश्वरी राम मंदीरात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. युवकांनी एकत्रित येत रक्तदानाचे मौल्यवान काम केले असून रक्तदान शिबिरात महिलांचा सहभाग होता.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचा पराभव

रक्तदानाचा शुभारंभ तहसिलदार शाम वाडकर,नायब तहसिलदार पंकज नेवसे, तालुका आरोग्यधिकारी डॉ भगवान दराडे,पशुसंवर्धन अधिकारी डॉ जगदीश पालवे,राहुल कारखेले,रवींद्र दानापुरे यांच्या उपस्थित करण्यात आला.

यावेळी बोलताना शाम वाडकर म्हणाले,रक्तदानासारख्या श्रेष्ठ उपक्रमात शहरातील युवकांचा असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद हा वाखाणण्याजोगा आहे.सध्याची नवी पिढी व्यसनाधीनकडे वळत असतांना एकीकडे रक्तदाना बद्दल युवकांची असणारी जागृती कौतुकास्पद आहे असे वाडकर म्हणाले.अमोल गर्जे,मुकुंद लोहिया,मुकुंद गर्जे,महेश बाहेती,अभय गांधी,कौतुक चिंतामणी, दीपक भागवत,राहुल भगत,शाहरुख शेख, ऋषिकेश करवा,जगदीश डागा,मुकुंद सुरणा आदींनी रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here