नितीन पाटील अधिकारी यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

नितीन पाटील

अकोले , ता . १८ /शांताराम काळे

मोबाईल  शॉपी फोडून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास राजूर पोलीसानी मुद्देमालासह जेरबंद केले आहे .हि कारवाई राजूर पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी केली आहे.

in article

nitin patil

याबाबत राजूर पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार  फिर्यादी राजूर येथील मोबाईल शॉपी मालक तॊफिक आयुब तांबोळी  याचे दुकान २७ /१०/२० रोजी फोडून दुकानातील ३०३५३ रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक सामान चोरी करण्यात आली होती याबाबत राजूर पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली .

राजूर पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील , सहायक फौजदार नितीन खैरनार तसेच पोलीस कर्मचारी यांचे मार्फत समांतर तपास  करत असताना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली कि , सदरचा गुन्हा हा विष्णू विठू सोडणार रा . घाटघर व सोमनाथ भूताम्बरे रा . समशेरपूर यांनी केला असून हे चिंचाचीवाडी ते घाटघर येथे असल्याचे समजताच तपस पथकातील सहायक फौजदार नितीन खैरनार , पो. हे. कॉ . आघाव, डगळे, प्रवीण थोरात , मोरे आदींनी जाऊन यातीळ विष्णू सोडनरयास  शिताफीने पकडलेत्यास विचारपूस केली असता त्याने आपला मित्र सोमनाथ भूतांबरे रा . समशेरपूर , चिंचाचीवाडी याने राजूर येथील मोबाईल शॉपी फोडून चोरी केली .

तर सोमनाथ भूतांबरे  याशी पोलिसांनी त्याचे घरातून अटक केली असता त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली तर इलेक्ट्रॉनिक साहित्य ध्वनी उपकरणे , हेडफोन , एल इ डी टीव्ही असा एकूण २८,८४७ असा मुद्देमाल मिळून आला तरहे दोघे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर  यापूर्वी गु. र . न . २५७/२०२० भा. द . वि कलम ४५४, ४५७ . ३८० पांजरे , शेंडी परिसरात घडलेल्या गुन्ह्यासंदर्भात गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यामुळे पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळून यापूर्वी त्याच्यावर २०१७,२०१८ मध्ये ३०२,३२४,३४१,४२७,३२३,५०४, ४५७,३८० (३४)प्रमाणे गुन्हे दाखल असल्याने अटक केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,अप्पर पोलीस अधीक्षक  श्रीमती दीपाली काळे ,उपविभागीय पोलीस अधिकारी  राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नितीन पाटील यांनी योग्य तपास करून आरोपीना अटक केली आहे .

हेही वाचा :जामखेड मध्ये घुबडाची तस्करी करण्याऱ्या टोळीस अटक 

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here