लोकन्यायालयामुळे तीन कुटुंबाचे संसार पुन्हा सावरले

lokadalat in beed
lokadalat in beed
लोकन्यायालयामुळे तीन कुटुंबाचे संसार पुन्हा सावरले
बीड,
lokadalat in beed लोक न्यायालयात तीन कुटुंबाचे संसार पुन्हा जूळून आले . दुभंगलेली मने परत सांधण्यात व संसार पुन्हा सावरण्यात लोक न्यायालयाची शिष्टाई यशस्वी झाली .
 महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरून व  हेमंत शं . महाजन साहेब प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि . ११ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हा विधी सेवा
प्राधिकरण बीडच्या वतीने बीड जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते . यात दुभंगलेली मने लोकन्यायालयामुळे पुन्हा जुळून आली.
कौटुंबिक न्यायालयातील दोन प्रकरणांत मा . जिल्हा न्यायाधीश क्र . ४ श्री . आर . एस . पाटील साहेब , कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एम . एम . अदवंत साहेब , समुपदेशक नागभिडे मॅडम यांनी सामोपचाराने दोन संसार परत
जूळवले . यापैकी एक दावा पोटगीचा होता तर दुसरा दावा नांदायला जाण्याचा होता . या दोन्ही बाबतीत लोक न्यायालयात यशस्वी तडजोड झाल्याने हे संसार परत जूळून आले . बीडमधील सालेहा शेख जिलानी यांचा अंबाजोगाई येथील शेख
जिलानी शेख महेबुब यांच्याशी विवाह झाला होता . संसारवेलीवर २ फुले आल्यानंतर त्यांच्यात बारीक सारीक कुरबुरी होउ लागल्याने प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले . मात्र आज झालेल्या लोक न्यायालयात दोन्ही पक्षात यशस्वी मध्यस्थी करण्यात
लोकन्यायालयाला यश आले . यावेळी मा . सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्री . एस . टी . सहारे यांनी दोन्ही बाजूंची समजूत काढून पत्नीला नांदवयास राजी केले . अशा रितीने हाही संसार जूळविण्यात न्यायालयाला यश आले .
सदरील लोक न्यायालयाच्या प्रसंगी मा . श्री . सिध्दार्थ ना . गोडबोले साहेब , सदस्य सचिव , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्यासह पॅनल विधीज्ञ , न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here