गंगाई बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार पत्रकार अविनाश कदम यांना प्रदान

गंगाई बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार पत्रकार अविनाश कदम यांना प्रदान

आष्टी। प्रतिनिधी

in article

गंगाई बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार पत्रकार अविनाश कदम यांना अभिनेत्री डॉ निशिगंधा वाड यांच्या हस्ते आष्टी येथे प्रदान करण्यात आला. यावेळी माजी आ. भिमरावजी धोंडे,सौ.दमयंतीताई धोंडे, युवा नेते अजय धोंडे, पाटोदा पंचायत समितीच्या सभापती सुवर्णाताई लांबरुड,ह.भ.प आंधळे महाराज
उपस्थित होते.
आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी अविनाश कदम हे मागील गेल्या १५ वर्ष पत्रकारिता क्षेत्रांमध्ये कार्यरत असून अनेक सामाजिक व गोरगरीब सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम व न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून करत असून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी शेतकरी शिक्षण संस्था संचलित भगवान महाविद्यालय आष्टी येथे आयोजित ‘गंगाई बाबाजी महोत्सव’ समितीच्या वतीने  या वर्षीचा २०२३ चा आदर्श पत्रकारिता पुरस्कार अविनाश कदम यांना <span;>प्रसिद्ध सिने अभिनेत्री डॉ निशिगंधा वाड,माजी आ. भिमरावजी धोंडे,सौ.दमयंतीताई धोंडे, युवा नेते अजय धोंडे, पाटोदा पंचायत समितीच्या सभापती सुवर्णाताई लांबरुड,ह.भ.प आंधळे महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पुरस्कार मिळाल्याबद्दल आ सुरेश धस, आ बाळासाहेब आजबे, माजी आ साहेबराव दरेकर, महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख,अनिल महाजन, संपादक सतीश बियाणी,  लोकमतचे बीड जिल्हा प्रतिनिधी अनिल लगड, विशाल साळुंखे,अनिल वाघमारे, जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, जितेंद्र शिरसाट,विलास डोळसे यांनी अभिनंदन केले आहे.तसेच सर्व स्तरातून त्यांचे  अभिनंदन व कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here