बाल दिनानिमित्त बाल हक्क परिषद व जनजागृती रॅली संपन्न

children’s day in beed
children’s day in beed

 

बीड

in article

children’s day in beed बालहक्क संरक्षण कृती समिती, सरकारी कामगार अधिकारी कार्यालय बीडच्या वतीने बीड शहरामध्ये बाल दिनानिमित्त जनजागृती रॅली व बालहक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले.

जनजागृती रॅली बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन काढण्यात आली. रॅलीमध्ये बालकांना विविध संदेश देत रोटी खेल पढाई प्यार हर बच्चे का है अधिकार, यासारख्या घोषणांनी सारे शहर दुमदुमले.children’s day 2022

children day 2022
children day 2022

हजारो बालकांनी  रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. रॅलीच्या समारोपणानंतर बाल हक्क परिषदेचे डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजन करण्यात आले. यावेळी बालकांनी त्यांच्या हक्क व त्यांच्या अधिकार याविषयी विविध मागण्यांचे मनोगत व्यक्त केले. बीड beed news जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची मुले, बालविवाह, बालमजुरी, बाल लैंगिक अत्याचार, भीक मागणारे मुले, स्त्रीभ्रूण हत्या, मुला मुलींमधील समानता, जेंडर फ्रेंडली वातावरण, मुलींच्या वस्तीगृहाची सोय, ग्रामीण भागातील शाळेत शिक्षकांची कमी,शाळेची दुरावस्था गरीबीमुळे शहरात शिकायला परवडत नाही. बालकांसाठी स्वतंत्र ग्रंथालय, अनाथ मुलांच्या समस्या कोविड-19 मधील अनाथ झालेले बालक या सर्व समस्या बालकांनी बाल अधिकार परिषदेमध्ये मांडल्या.

beed news today  बालहक्क परिषद व जनजागृती रॅलीसाठी पोलीस अधीक्षक  नंदकुमार ठाकूर  न्या. सिद्धार्थ गोडबोले सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,  संगीता ताई चव्हाण सदस्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रज्ञाताई खोसरे सदस्य बाल हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई, सुहासिनी देशमुख जिल्हा क्रीडा अधिकारी बीड, श्रीकांत कुलकर्णी शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद, मनिषा ताई तोकले, दत्ता बारगजे, संध्या बारगजे ,अशोक तांगडे अध्यक्ष बालकल्याण समिती बीड मंगेश जाधव परीक्षा अधिकारी जिल्हा महिला बाल विकास विभाग बीड शेखर कानडे माथाडी कामगार अधिकारी संगीता मकरंद उपयुक्त जात पडताळणी विभाग समाज कल्याण बीड संतोष वारे सागर सोनवणे सोनिया हंगे दत्ता नलावडे ओम प्रकाश गिरी बाजीराव गिरी बाजीराव ढाकणे तत्वशील कांबळे कामिनी पवार मिथुन जोगदंड महाराष्ट्र गुरुकुल परिषदेचे पदाधिकारी सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते.

रॅली संपन्न करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान महाराष्ट्र लोकविकास मंच बीड शहरातील सर्व शाळा महाराष्ट्र गुरुकुल परिषद बीड, तुळजाभवानी सेवाभावी संस्था यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here