चिचोंडी येथील ग्रामसेवक व सरपंचांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी आणि कारवाई न झाल्यास आमरण उपोषण

चिचोंडी ग्रामसेवक सरपंच

अकोले दि 26  फेब्रुवारी,प्रतिनिधी

तालुक्यातील चिचोंडी येथील ग्रामसेवक व सरपंचांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेच्या दालनात आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे चिचोंडी ग्रामस्थांनी दिला आहे. अकोले तालुक्यात राजूर,लाडगाव,शेणित,बारी या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकांनी केलेला भ्रष्टाचाराची चौकशी सुरु  असतानाच मात्र चिचोंडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांनी चिचोंडी ग्रामपंचायत मध्ये कोणालाही विश्वासात न घेता तसेच ग्रामसभा न घेता गावाला विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने निधीचा भ्रष्टाचार केला.

चिचोंडी ग्रामसेवक सरपंच

याबाबत अनेकदा अकोले येथील गट विकास अधिकारी यांच्या दालनात भ्रष्टाचाराच्या चौकशीबाबत वारंवार चर्चा झाली पण मात्र गट विकास अधिकारी यांच्याकडून वारंवार चौकशी करतो असे सांगण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही. काही दिवसापूर्वी निवेदने दिले व उपोषण बसल्यावर तात्पुरते आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास भाग पाडले. परंतु दोषींवर कारवाई न झाल्याने नुकतेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर असे म्हटले आहे की स्वतः सरपंच श्री संदीप मेंगाळ यांचे आईचे नावे, भावाच्या नावे व वडील स्वतः पाटबंधारे विभागात सेवेत असताना घरकुल घेता येत नसतानाही घरकुलाचा लाभ घेऊन प्रशासनाची दिशाभूल करून शासनाच्या निधीचा भ्रष्टाचार केला आहे. तसेच चिंचोडी गावातील घरकुल यादी निवडताना व ग्रामसभा न घेता निकष डावलून त्यांच्या जवळच्या लोकांना चुकीच्या पद्धतीने निवड करून खरे वंचित लाभार्थ्यास जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आले आहे. तसेच आरोग्य, महिला बालकल्याण शिक्षण या निधीचा कोणताही खर्च न करता रस्त्यावर सर्व निधी खर्च केला.

चिचोंडी ग्रामसेवक सरपंच

ग्रामनिधी, ग्रामीण पाणीपुरवठा निधी १३ वा वित्त आयोग १४ वा वित्त आयोग, मागास क्षेत्र अनुदान निधी या निधीबाबत काय विकास कामे व खर्च केले याची चौकशी व्हावी तसेच गेली पाच वर्षाच्या कालावधीतील कामाचे अंदाजपत्रक, कार्यारंभ आदेश, मूल्यांकन मोजमाप पुस्तकाच्या साक्षांकित प्रती मिळाव्यात, मासिक सभा, ग्रामसभा, महिला ग्राम सभा तसेच सभेच्या इतिवृत्तच्या प्रती मिळाव्यात. तसेच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व कर्मचारी यांनी घरकुलाचा लाभ घेतलेला आहे याबाबत चौकशी व्हावी, पेसाचा गोरगरीब जनतेचा आज मितीस आलेला मोठा निधी शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. तसेच १४ वा वित्त आयोगाचा मोठ्या प्रमाणात निधी शिल्लक आहे.तर ग्रामसभेला विश्वासात न घेता आराखडा परस्पर सरपंच व ग्रामसेवक यांनी पंचायत समिती अकोले यांना सादर केला. गेल्या तीन वर्षापासून ग्रामसभा न घेता व गावाला विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने निधीचा भ्रष्टाचार केला याची संपूर्ण चौकशी व्हावी आणि आर्थिक फायद्यासाठी ज्या कामांमध्ये जास्त फायदा आहे तीच कामे सरपंच स्वतः निवड करून कोणतेही काम करताना निधीचा दुरुपयोग केला या सर्व बाबींची चौकशी होऊन संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करावी तसेच योग्य ती कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद अहमदनगर दालनात कोणत्याही प्रकारची सूचना न देता चिचोंडी येथील ग्रामस्थ उपोषणास बसणार असल्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर सुरेश गभाले, राजेंद्र मधे, दत्ता लोटे, गणेश मधे, निवृत्ती मधे, किसन लोटे, किसन मधे, कुंडलिक घारे, काळू बांडे, दिलीप धनगर आदींसह ग्रामस्थाच्या  स्वाक्षऱ्या आहेत.

 एकनाथ चौधरी.  गटविकास अधिकारी, अकोले पंचायत समिती.

चिंचोडी येथील ग्रामसेवक व सरपंच यांना नोटीस बजावली असून अद्यापही ग्रामसेवकाने खुलासा केला नाही. त्याबाबत वरिष्ठांना चार्जशीट दाखल करुन निलबनाची मागणी केली असून विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे.तसेच दोषी आढळणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचावर कडक कारवाई करणार आहे. 

हेही वाचा :व्यापाऱ्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने अन्टीजेन चाचण्या गुंडाळल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here