बीड जिल्ह्यात दोन लाख 17 हजार बालकांना पोलिओ लसीकरण

पोलिओ

बीड दि 31 जानेवारी, प्रतिनिधी
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम जिल्हयात राबविण्यात आली.
या मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र नाळवंडी येथे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप,मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांचे हस्ते करण्यात आले.जिल्ह्यातील दोन लाख 17 हजार बालकांना पोलिओ लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली.
यावेळी डॉ.सचिन देसाई,सहाय्यक संचालक,राज्य कुटुंब कल्याण भवन पुणे, जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा शल्य चिकीत्सक,डॉ.सुर्यकांत गिते,निवासी वैद्यकीय अधिकारी (बाहय संपर्क) डॉ.बाबासाहेब ढाकणे, केशरबाई घुमरे,सदस्या,जि.प.बीड,गंगाधर घुमरे,तालुका अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष,
उत्तरेश्वर सोनवणे,सदस्य,पंचायत समिती बीड नाळवंडी प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी,डॉ.प्रज्ञा तरकसे व डॉ.
सोनाली सानप तसेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक,डॉ .इनामदार, स्मिता नलावडे,पी.एच.एन.,जि.प.
बीड,जिल्हा लेखा व्यवस्थापक,संतोष चक्रे,शेषनारायण हाटवटे,श्रीमती कुर्लेकर,श्रीमती शाईवाले,तसेच
अयुबखान, शेलकर, बी.सी.चव्हाण, शिवाजी सोनवणे,आर.एस.बहीर,डोंगरे,गोरे,सतकर यांची उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी बालकांना पोलिआ डोस पाजण्यात आले.

अंबाजोगाई तालुक्यात प्रा.आ.केंद्र घाटनांदुर येथे राष्ट्रीय पल्स पोलीओ मोहिमेचे उदघाटन शिवकन्याताई सिरसाट (अध्यक्षा,जि.प.बीड) यांच्या हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
ज्ञानोबा बप्पा जाधव (सरपंच ,ग्रा.पं.घाटनांदुर) हे होते.यावेळी मा.श्री.शिवाजीभाऊ सिरसाट (नेते,राष्ट्रवादी
काँग्रेस),बाळासाहेब देशमुख (उपसरपंच,ग्रा.पं.घाटनांदुर),मच्छिंद्र वालेकर (सदस्य,पं.स.अंबाजोगाई), मुक्तार भाई (तंटामुक्ती अध्यक्ष,घाटनांदुर),सुरेश जाधव (माजी उपसरपंच,ग्रा.पं. घाटनांदुर),डॉ.बालासाहेब लोमटे (तालुका आरोग्य अधिकारी,अंबाजोगाई) यांची उपस्थिती होती. डॉ.ज्ञानोबा मुंडे (वैद्यकिय अधिकारी),डॉ.व्ही.बी.घोळवे ,वैद्यकिय अधिकारी,डॉ.माधव जाधव (वैद्यकिय अधिकारी, प्रा.आ.केंद्र घाटनांदुर),तसेच गोरे एस.के.(आरोग्य सहायक),श्रीमती ए.आर.शेख (आरोग्य सहाय्यीका ),पुजारी ए.एम.(आरोग्य कर्मचारी),श्री.जाधव पी.व्ही.व आशा स्वंयसेविका उपस्थित होत्या.

in article

केज तालुक्यात प्रा.आ.केंद्र युसूफ वडगाव येथे बजरंगबप्पा सोनवणे,उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य
सभापती,जि.प.बीड,पंचायत समिती सदस्य,उमाकांत भुसारी,सरपंच सचिनजी जावळे ग्राम पंचायत सदस्य
लामतुरे,रुग्ण कल्याण समिती सदस्य चंद्रकांत थळकरी,शरद शिंदे,रुपेश बोरगावकर,तालुका आरोग्य अधिकारी,डॉ.विकास आठवले,वैद्यकीय अधिकारी डॉ.नंदकुमार नेहरकर,डॉ.विद्रोही ब्राम्हणे तसेच सर्व कर्मचारी व आशा,अंगणवाडी कार्यकर्ती यांची उपस्थिती होती.
• बीड जिल्हयाची एकूण लोकसंख्या २६८४८८९
• अपेक्षित लाभार्थी २१४०८८
•३६६००० पोलिओ डोस प्राप्त
•२ कर्मचारी असलेल्या बुथची संख्या ११००
•३ कर्मचारी असलेले बुथ १२५७
•एकूण बुथ २३५७
• ५९७१ कर्मचारी
• पोलिओ लस दिलेली एकूण बालके २१७७४२
• कामाची एकूण टक्केवारी १००%
• अति जोखमीच्या कार्यक्षेत्रात दिनांक ३० जानेवारी २०२१ रोजीच सायंकाळी बालकांना पोलिओचे डोस
देण्यात आले आहेत. उर्वरीत वंचित बालकांना मंगळवारपासून पुन्हा गृह भेटी देऊन लस दिली जाणार आहे .शहरात ५ दिवस तर ग्रामीण भागात ३ दिवस ही मोहीम सुरु राहणार आहे. तरी पालकांनी आपल्या पाल्यांना न चुकता पोलिओ लस दयावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ.आर.बी.पवार यांनी केले आहे.

आणखी वाचा:अंबेजोगाईकरांनी जागविल्या प्रख्यात गझलकार इलाही जमादार यांच्या आठवणी

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here