प्रख्यात गझलकार इलाही जमादार यांच्या आठवणी 

इलाही जमादार

अंबेजोगाई दि ३१जानेवारी,प्रतिनिधी

जखमा कशा  सुगंधी,झाल्यात काळजाला 

in article

केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा…..

वाटे खरा असावा,अंदाज आरशाचा

बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा

ह्या ओळी कानावर पडल्या कि इलाही जमादार यांचे नाव डोळ्यासमोर येते. प्रसिद्ध गझल गायक भीमराव पांचाळे यांनी गायलेली इलाही जमादार यांची गझल. इलाही जमादार हे नामवंत गझलकार.सांगली जिल्ह्यात त्यांचे निधन झाले. त्याच्या निधनाने गझल प्रांत पोरका झाला.त्यांच्या आठवणी अंबेजोगाई येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे दगडू दादा लोमटे यांनी जागविल्या.

दगडू दादा लोमटे म्हणाले कि ,”इलाही जमादार,माझे आवडते गझलकार, चांगले मित्र इलाही जमादार यांचं दुःखद निधनाची बातमी धक्कादायक आहे.अलीकडे त्यांची तबेत ठीक नव्हती. कोरोना मूळे अलीकडे पुण्याला जाणे झाले नाही. गेल्या मार्च महिन्यात 4 तारखेला त्यांना शेवटचा भेटलो.  निखळ मित्र व उत्तम गझलकार.  त्यांना अनेक वेळा अंबाजोगाईला बोलावले. यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह, मसाप शाखा अंबाजोगाईच्या कवी संमेलनात ते सहभागी झाले होते.  त्यामुळे त्यांचा सहवास  लाभला. पुण्यात गेलो की हमखास त्यांना कदम वाड्यात जाऊन भेटणे हा शिरस्ताच होता. त्यांना भेटलो की खूप आनंद व्हायचा. वेळ काढून भेटतो. त्यांची ख्याती खुशाली घेत राहिलो. ते विचाराने व मनाने विशाल व्यक्तिमत्वाचे होते.त्यांच्या जाण्याने गझल क्षेत्र व मित्रांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. व्यक्तिगत माझे प्रेमळ मित्र गेल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.आयुष्य भर सुगंधी जखम घेऊन दरवळत राहणारे इलाही आज आपल्यात नाहीत ही खूप वेदनादायी घटना आहे।त्यांना माझी भावपुर्ण श्रद्धांजली!”

हेही वाचा:साहित्य संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी आपण सर्व नाशिककरांची-पालकमंत्री छगन भुजबळ

गझलकार इलाही जमादार यांच्या विषयी थोडेसे……

सबंध गझल विश्वाला सुपरिचित असलेले प्रख्यात गझलकार इलाही जमादार यांचे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमाराला मिरज तालुक्यातल्या दुधगाव या त्यांच्या जन्मगावी दीर्घ आजार आणि वृद्धापकाळाने निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. एक मार्च 1946 सालि जन्मलेल्या ईलाही जमादार यांनी 1964 पासून काव्य करायला सुरुवात केली. त्यांच्या  पश्चात भाऊ, भावजयी,, बहिण, नातू सुहान जमादार असा कौटुंबिक परिवार आहे. त्याचबरोबर गझल वर प्रेम करणारा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील लाखो रसिकांचा समावेश असलेला मोठा परिवार आहे. दिवंगत इलाही जमादार यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 1 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी दहा वाजता सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातल्या मौजे दुधगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांनी  महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर मराठी व हिंदी काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम केले. नवोदित मराठी कवींसाठी त्यांनी ठिकठिकाणी गझल कार्यशाळांचे आयोजन केले होते. दूरदर्शन टेलिफिल्म व धारावाही मालिकांसाठी ही त्यांनी गीतलेखन केले. मर्मबंध, सप्तरंग, गीतांजली, गणेशपुराण, नसते उद्योग, राजाशिवछत्रपती, अण्णाभाऊ साठे, विकास गंगा,, एक होता बिरबल, या मराठी धारावाही मालिकांसाठी त्यांनी गीतलेखन केले. त्याचबरोबर सनक, आखरी इंतजार, अहसास अपने अपने, स्वामी समर्थ, पोलीस भी एक इन्सान है , विनायक दामोदर सावरकर या हिंदी धारावाही साठी त्यांनी गीतलेखन केले. एक जखम सुगंधी, शब्द सुरांची भावयात्रा, स्वप्न तारकांचे, भावनांची वादळे,, गझल गुंजन, सम्राट अशोक या त्यांच्या ध्वनीफिती प्रकाशित झालेल्या आहेत. हिंदी संगितिका, नृत्यनाट्य, त्याचबरोबर राज्यस्तरीय स्पर्धेच्या नाटकांसाठी त्यांनी गीतलेखन केले. व्यवसायिक नाटकांच्या गीत लेखनातही त्यांचा हातखंडा होता. मराठी चित्रपटांसाठीही त्यांनी गीतलेखन केले. षंढ युग, झंजावात, बरखा सातारकर,, मृत्यू चक्र, सौभाग्यकांक्षिणी, कलम 302, सूर्योदय- एक नवी पहाट ,या चित्रपटातील त्यांच्या गीतांना अल्फा गौरव आणि मठाचे उत्कृष्ट गीतकार म्हणून नामांकन मिळाले होते. 2004 साली सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणूनही त्यांना पुरस्कार प्राप्त झाला. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक पुरस्कार इलाही जमादार यांना मिळालेले आहेत. इलाही जमादार यांची ग्रंथसंपदा खुप मोठी आहे. सहा पुस्तके त्यांनी हिंदीतून मराठीमध्ये अनुवादित केलेली आहेत. त्याचबरोबर त्यांनी लिहिलेल्या गजलांची वीस पुस्तके प्रकाशित आहेत. त्यामध्ये जखमा अशा सुगंधी, मला उमगलेली मीरा, समग्र दोहे इलाही, गुफ्तगू, अर्घ्य, चांदणचुरा, रंगपंचमी, निरागस, फुलपाखरू, अभिसारिका, भावनांची वादळे, वाटसरू , सखये, मोगरा, तुझे मौन, ओयासिस, आभास, अनुराग, अनुष्का आणि 15000 दोह्यांचा समावेश असलेले “दोहे इलाहीचे” भाग एक आणि भाग दोन हे दोन संग्रह त्यांच्या नावे आहेत. इलाही जमादार यांनी खरेतर वयाच्या 75 रीमध्ये प्रवेश केलेला होता. आणि येत्या १ मार्च २०२१ रोजी त्यांचा वाढदिवस होता. त्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. इलाही जमादार यांच्या जाण्यामुळे गझल विश्वावर, गझल चाहत्यांवर, मराठी रसिकांवर, त्याचबरोबर हिंदीभाषीकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here