बीड रस्त्यावर अपघात:चार ठार

0
33
Beed news accident

Beed news accident : बीड रस्त्यावर अपघात:चार ठार

आष्टी
Beed news accident : नगर हून बीडकडे जात असलेल्या क्रेटा गाडीला वळणाचा अंदाज न आल्याने म्हसोबावाडी येथे अपघात झाल्याने चार जण जागीच ठार झाले . तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून,अपघातातील मयत चारही जण बीड येथील टेकवानी कुटूंबातील असल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,बीड येथील टेकवानी जनरल स्टोअर्सचे मालक व अन्य चालकासह पाचजण अहमदनगरहून धामणगांव मार्गी बीडला आपले काम आटपून निघाले असता राञी 9 च्या सुमारास ते कारखेल जवळील म्हसोबावाडी फाटा जवळ वळण लक्षात न आल्याने क्रेटा गाडी क्र.एमएच 23 ए एस 4025 सरळ रस्त्याच्या खाली गेली गाडी जास्त भरधाव होती.या गाडीचा अपघात झाला अपघात एवढा जोराचा होता की,यातील चार जण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला असल्याची प्राथामिक माहिती समोर येत आहे.घटनास्थळी अंभोरा पोलासांनी धाव घेतली आहे.

in article

हा अपघात बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
बीड शहरातील प्रसिद्ध व्यापारी असलेल्या टेकवाणी कुटुंबातील पाच जण पुण्याहून बीडकडे येत होते. गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने दोन-तीन पलटी घेऊन रस्त्याच्या कडेला जावून आदळली. या अपघातात टेकवाणी कुटुंबातील सुनील टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतीश टेकवाणी, लखन टेकवाणी यांचा जागीच मृत्यू झाला. टेकवाणी कुटुंब बीडमधील एक प्रतिष्ठीत व्यापारी कुटुंब म्हणून ओळखले जाते. एकाच कुटुंबातील चौघांच्या झालेल्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होतीय.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here