आमदार यांनी तालुक्याच्या आरोग्यासाठी निधी देण्यास भाग पाडावे

आमदार

अकोले, ता . १८: तालुक्याचे लोकप्रतिनिधी केवळ आंदोलने करून प्रश्न सोडविणार कि , सरकारी दरबारी आपली ताकद पणाला लावून तालुक्याचे आरोग्य सुधरण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न  करणार कारण तालुक्याचे आरोग्य बिघडत असून रुग्ण रेमेडीसी साठी आपले जीव गमवताना दिसत आहे . ताKiran Lahamate 25akole 202006446285लुक्यात केवळ एक सरकारी कोव्हीड सेंटर असून इतर तीन खाजगी जरी असले तरी गरीब रुग्णांना महागडी औषधें घेणे न परवडणारी आहेत . तर श्रीमंत रुग्णांना ऐपत असून  ऑक्सिजन व रेमिडीसी मिळने  अशक्य झाल्याने रुग्णाचे नातेवाईक दाही दिशा  भटकंती करून इंजेक्शन साठी रात्रीचा दिवस करून औषधें व इंजेक्शन महत्प्रयासाने मिळवत आहेत तर काहींना मिळत नसल्याने प्राण गमवावे लागत आहे . याउलट संगमनेर ,  पारनेर ,  तालुक्यात ११००  कोव्हीड    केंद्र सुरु  होतात मुबलक प्रमाणात रेमिडीसी व ऑक्सिजन मिळते मग आपला तालुक्यावरच अन्याय का होतो आपण कुठे कमी पडतो याचे अवलोकन होणे आवश्यक आहे . केवळ सर्वपक्षीय गोंडस नाव देऊन तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्याच्या विधानसभेतील समर्थक घेऊन तहसीलदार कचेरीवर शासनाचे  निर्बंध असतानाही  आंदोलन करून प्रांत यांच्या बदलीची मागणी करणे हे सयुंक्तिक वाटत नाही . राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना राष्ट्रवादी , शिवसेनेच्या नेत्यांनी आरोग्य , रस्ते , पाणी योजनेसाठी रस्त्यावर उतरणे तसेच चाळीस वर्षात काय केले आम्हाला सत्ता द्या आम्ही तालुक्याचे नंदनवन करू असे विधानसभेतील आश्वासने अजून दिड  वर्षे झाले तरी प्रत्यक्षात दिसत नसल्याने सामान्य मतदार जनता संभ्रम अवस्थेत आहे , परिवर्तन होऊनही तालुक्याला साधे इंजेक्शन व्हेंटिलेटर , पीपीई किट , आरोग्य कर्मचारी कमतरता ,यासाठी  तहसील कार्यालयाला टार्गेट करून प्रांताच्या बदलीची मागणी केली जाते  त्यापेक्षा काल   पालकमंत्री  नगर येथे होते सर्व जिल्ह्यातील आमदार , खासदार यान त्याची भेट घेऊन आपले प्रश्न सोडविताना दिसले मग तालुका का मागे शिष्ट मंडळाने नगर दोन तासात गाठले असते तर सामुदायिक प्रश्न मार्गी लागले असते .  याचा अर्थ  प्रश्नाची रस्त्यावर पब्लिसिटी करून मूळ प्रश्नाला बगल द्याची असे तर नाही ना . तालुक्याचे प्रशासन कोरोनापासून चांगले काम करते ,  महसूल ,आरोग्य प्रशासन अडचणीवर मात करून स्वतःचे जीव  धोक्यात घालून काम करीत असताना लोकप्रतिनिधींनी त्याची बाजू घेणे अपेक्षित होती मात्र तसे घडताना दिसले नाही , तर अधिकारी उलट सुलट उत्तरे देतात म्हणून   पालकमंत्री याना तक्रार करणे याबाबीवर विचार करण्याची गरज असल्याचे जनतेचे म्हणणे आहे . माजी मंत्री मधुकर पिचड माजी आमदार वैभव पिचड हे सत्तेच्या बाहेर असतानाही तालुक्यात कोव्हीड सेंटरसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे ,८० वर्ष वय असताना  तालुक्यात अकोले , राजूर येथे केंद्र सुरु करून  लोकवर्गणीतून रुग्णांना सेवा देण्याचे काम स्थानिक ग्रामपंचायत व अगस्ती कारखान्याच्या वतीने सुरु केले आहे . तालुक्यात त्यांनी मंत्रिपदाच्या काळात  आरोग्य सेवेचे जाळे विणले असून फक्त कर्मचारी वाढविणे  औषधें उपलब्ध करून देणे व त्यान्च्याकडून  काम करून घेणे हेच काम लोकप्रतिनिधींचे आहे . कोतुळ सारख्या ठिकाणी दोन डॉक्टरांचा मृत्यू होतो केवळ दहा बाय  दहाच्या सदनिके मध्ये  उपचार करणे त्यात डॉक्टर नसणे हि गोष्ट तालुक्याचे आरोग्य बिघडविणारे आहे . सध्या अकोले, कोतुळ , राजूर , समशेरपूर या ठिकाणी रुग्णाची व्यवस्था करण्यात अली असली तरी खेड्यात हे संक्रमण वाढले तर आवरणे मुशिक्ल होणार आहे . तेव्हा याचे नियोजन आज झाले तरच तालुक्याचे आरोग्य बरे राहील असे जाणकारांचे मत आहे . त्यासाठी लोकप्रतिनिधींनी व जेष्ठ नेत्यांनी तालुक्याच्या बाबत सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे .  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here