आष्टी तालुक्यात ऑक्सीजन प्रकल्पाला मंजूरी द्यावी

ऑक्सीजन

 

कोव्हिड सेंटरला परवानी दिल्यास चालविण्यास तयार

आष्टी दि 18 एप्रिल प्रतिनिधी
गेल्या पंधरा दिवसांपासून आष्टी तालुक्याची कोरोना बाधीतांची संख्या तीन अंकी होत आहे.  पाटोदा व शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने या मतदार संघात रेमडेसीवर इंजेक्शन,वॅक्सीन पुरेशा प्रमाणात  उपलब्ध करून द्यावा आणि ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाला मंजूरी देण्याची  मागणी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली  असल्याची माहिती  माजी आ.भीमसेन धोंडे यांनी दिली .

in article

आष्टी येथील पंडित जवाहर नेहरू विद्यालयाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत माजी आ.धोंडे बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले की,सध्या बीड जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा अकडा दररोज एक हजाराच्या पुढे असून,आष्टी तालुक्यातही तीन अंकी कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

ब-याच कोरोना रूग्णांना उपचारासाठी बेड शिल्लक मिळत नाहीत.आणि मिळाले तर ऑक्सीजन अभावी त्यांना आपले प्राण गमवावा लागत आहे.सध्या कोरोनाची भयान परिस्थिती निर्माण झाल्याने आष्टी,पाटोदा व शिरूर तालुक्यात प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर रेमडेसीवीर इंजेक्शन आणि लसही जास्त उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.तसेच आष्टी हे बीड जिल्ह्यापासून शंभर कि.मी. तर अंबाजोगाई पासून दिडशे कि.मी आहे.त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील कोरोनाबाधितांना उपचारा घेऊन जाईपर्यंत त्यांना जीव गमवावा लागतो.याचा विचार करून जसा अंबाजोगाई येथे ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाला मंजूरी दिली आहे.तशीच मंजूरी आष्टी तालुक्यात द्यावी अशी मागणी आपण राज्याचे मुख्यमंञी उध्दव ठाकरे,उपमुख्यमंञी अजित पवार,विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, पालकमंञी धनंजय मुंडे,माजी पालकमंञी पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडे आपण निवेदनाद्वारे मागणी केली असल्याचेही माजी आ.भीमसेन धोंडे यांनी केली.
तसेच सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्ण वाढत असून,कोरोना बाधितांना उपचार घेण्यासाठी बेड कमी पडत आहेत. परंतु जर उपचारासाठी बेड कमी पडत असेल तर आपण आनंद चॅरीटेबलच्या वतीने दोनशे बेडचे जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली तर चालविणार असल्याचेही माजी आ.भीमसेन धोंडे यांनी सांगितले.

आणखी वाचा :राज्यातील शेतकरी कुटुंबातील युवतीसाठी श्रद्धा रोल माँडेल ठरेल-पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here