कायदा साक्षरतेची चळवळ उभी राहण्याची आवश्यकता

akole news court
akole news court

अकोले,

akole news court भारतीय संविधानाने आपणाला अधिकार दिले आहेत किंवा त्यांच्यासाठी ज्या तरतुदी करून दिल्या आहेत त्याचे निराकरण करण्यासाठी सुद्धा अधिकार आहेत.

in article

मात्र प्रत्येकाने कायदा पाळला पाहिजे यात कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही .आपण कायद्याच्या चौकटीत राहून आपले जीवन जगले तर आपले जीवन सुखकर होईल असे सांगतानाच अहमदनगर जिल्हा प्रगत असला तरी कायदा साक्षर नसल्याने त्याला प्रगत म्हणता येणार नाही ,कायदा साक्षरतेची चळवळ उभी राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी यांनी राजूर न्यायालयाच्या उदघाटन प्रसंगी केले.

रविवार दिनांक २०ऑगष्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी यांच्या शुभहस्ते व मा. न्यायमूर्ती संतोष चपळगावकर उच्च न्यायालय मुंबई,मा.सुधाकर यार्लगड्डा जिल्हा व सत्र न्यायधीश यांच्या उपस्थितीत akole rajur court राजूर,येथील दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाचे उदघाटन सकाळी साडेदहा वाजता संपन्न झाले. यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड ,आमदार किरण लहामटे, मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालेमट, डीवायएसपी स्वाती भोर उपस्थित होते.

भैरवनाथ कला मंडळ अंबित, यांनी आदिवासी नृत्य सादर केले तर महाराष्ट्र गीताने व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

स्वागत ,प्रास्तविक वकील संघाचे अध्यक्ष रमेश जोरवर, यांनी केले ,उदघाटन न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी,न्यायमूर्ती संतोष चपळगावकर,न्यामुर्ती सुधाकर येर्लागड्डा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

परिचय,सूत्रसंचलन ऍड किसन हांडे यांनी केले.वकील संघाचे अध्यक्ष रमेश जोरवर यांनी १९८०पासून म्हणजे ४३वर्षे लढा सुरू होता. तो न्यायालय आल्याने सुटला आहे.अकोले येथे सिनियर डिव्हिजन न्यायालय व्हावे .

जिल्हा न्यायाधीश सुधाकर येर्लागड्डा म्हणाले आजचा दिवस सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा आहे.न्यायालयाने राजूरचा चेहरा बदलणार आहे.न्यायालय तीर्थ क्षेत्र आहे.. राजूर हे आदर्श न्यायालय ठरणार आहे.न्यायालयात येण्यापूर्वी वाद मिटवावे ,सर्व समस्यांवर मात करून न्यायालय सुरू करण्यात आले.उच्च न्यायालयाच्या आशीर्वादाने हे न्यायालय सुरू झाले.

न्यायमूर्ती संतोष चपळगावकर म्हणाले न्यायव्यवस्थेचं केंद्र बिंदू सामान्य माणूस आहे.हक्कामुळे वाद,खटल्याची संख्या कमी जास्त होते त्याने विकास होत नसतो म्हणुन खटल्यांचा निपटारा तातडीने करावा. न्यायालय निर्माण होण्यासाठी जनतेने, लोकप्रतिनिधींच्या अथक प्रयत्नाने हा दिवस पाह्यला मिळाला ,न्यायालयातून बाहेर जाणाऱ्या व्यक्तीचे समाधान, आनंद हाच न्यायालयाचा उद्देश आहे.खटल्याची संख्या वाढू द्या, घाबरू नका .जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळावा हा उद्देश आहे.

akole news राजूर तालुक्यातील सर्व जनता नक्कीच योग्य फायदा घेईल .वादाचा कोर्टाच्या माध्यमातूनच निपटारा व्हावा असे नाही, सामाजिक संस्थांनी पुढे येऊन वाद मीटवावेत ,वकील बांधवानी सर्व जनतेला मार्गदर्शन करावे.

अयोध्याच्या राम मंदिराच्या प्रदक्षिणा शिल्पांची होतेय नगर मध्ये निर्मिती

श्रीमती विभा कंकणवाडी म्हणाल्या … न्यायालयात येण्यापूर्वी तडजोडीने प्रश्न मिटवावेत,तडजोडीसाठी राजूर येथे व्यासपीठ निर्माण झाले . सुसज्ज इमारतीची गरज आहे .भविष्यात इमारत होईल .पार्किंग, महिला वकील रूम ,आधुनिक उपकरने , चौकशी कक्ष,सोयीने युक्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंग उपलब्ध करून देण्यात येईल ,नेटवर्कचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू,
संगणक साक्षर होण्याची गरज आहे.

विविध ॲप आलेले असून उच्च न्यायालयात काय निकाल लागला त्याची माहिती अवगत करण्याची आवश्यकता आहे.
आदिवासीच्या विकासासाठी, उन्नतीसाठी ज्या गोष्टी असतील ते प्रशासन करेल, कायद्याच्या बाबत ज्या गोष्टी असतील त्या या न्यायालयमार्फत होतील,वाहतूक बाबत बऱ्याच गावी एकच बस उपलब्ध आहे.

akole news today जिल्हाधिकारी यांनी लक्ष्य घालून वाहतुकीची चांगली व्यवस्था कशी होईल ते पहावे. म्हणजे प्रगत समाजाबरोबर आदिवासी कसे येतील ते पाहावे, कमी उत्पन्न गटाच्या लोकांनी कायदेविषयक सल्ला घ्यावा ,सिनियर कोर्टात लक्ष्य घालू .त्याचे जे निकष आहे ते असतील तर होईल .बारने मागणी केली म्हणजे कोर्ट करणे हे योग्य नाही .

केसेस वर तसेच जागा उपलब्ध होणे,सरकारने उपलब्ध करून दिली तर या गोष्टी ठरवता येतील. मी आश्वासन देणार नाही कारण आम्ही न्यायालय आहोत.
संविधानाने दिलेले न्यायालय आहे .या इमारतीचे पावित्र्य जपावे .
संगणकीय ज्ञानाचा वापर करून न्यायालयीन खटल्यांचा निपटारा करावा. सामान्यांना न्याय मिळणारे न्यायमंदिर व्हावे.
आभार राजूर दिवाणी न्यायाधीश न्यायमूर्ती एस.बी.नवले यांनी मानले .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here