ऊसतोड कामगार पाल्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढाकार घेणार

beed sugarcane cutter 
beed sugarcane cutter 

बीड

beed sugarcane cutter  बीड जिल्ह्यातून दरवर्षी हजारोंच्या संख्येने ऊसतोड कामगार पाल्यांचे स्थलांतर पश्चिम महाराष्ट्रात होते. कारखान्यावर जाताना ऊसतोड कामगार आपल्या पाल्यांनाही सोबत घेऊन जातात.

in article

परिणामी ही मुले शाळाबाह्य होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. गेल्या वर्षी बीड जिल्ह्यातून एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील ११ कारखान्यांवर १ हजार ९०८ मुले शाळाबाह्य आढळून आले होते. कोल्हापूर स्थित अवनी संस्थेने याबाबत सर्वे केला होता.

दरम्यान, आगामी हंगामात अशा पध्दतीने मुले शाळाबाह्य होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी बीड व कोल्हापूर येथील सामाजिक संस्था पुढाकार घेणार आहेत.

Bhoomi online certification of Maharashtra भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला असा करा ऑनलाईन अर्ज

बीड येथील जागर प्रतिष्ठान, राजर्षि शाहु महाराज प्रतिष्ठान, महिला ऊसतोड कामगार संघटना व कोल्हापूर येथील अवनी संस्था या संस्थांच्या वतीने ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने काम केले जाते. आता येत्या दोन महिन्यात सन २०२३-२४ चा गाळप हंगाम सुरु होणार असून या हंगामात बीड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार हे कारखान्यांवर जाणार आहेत.

कामगार कारखान्यावर गेल्यानंतर त्यांच्या पाल्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी शासन पुढाकार घेते. परंतु, पुरेशा जनजागृती अभावी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यात अडथळा येतो. तसेच काही पालक हे मुलांना स्वत:सोबत थेट कारखान्यांवर घेऊन जातात.

अशा स्थितीत मुलांवर शाळाबाह्य होण्याची वेळ येते कोणतेही बालक शाळाबाह्य राहू नये याची काळजी घेण्याची काम सदरील संस्था करणार आहेत .

हे टाळण्यासाठी जागर प्रतिष्ठन, राजर्षी छत्रपती शाहु महाराज प्रतिष्ठान, अवनी संस्था संयुक्तपणे कोल्हापूर व बीड जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात राहून शासनाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. एकतर जिल्ह्यातील मुलांची जिल्ह्यातच सोय व्हावी, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

काही ऊसतोड कामगार पाल्य जर कारखान्यांवर गेले तर त्यांना शिक्षण हमी पत्र मिळवून देत कारखाना परिसरातील शाळेत त्यांची व्यवस्था केली जाणार आहे.

मुलांचे शाळाबाह्य होण्याचे प्रमाण कमी करण्यासह महिला ऊसतोड कामगारांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठीही या संस्था परस्पर समन्वयातून काम करणार आहेत.

या कामगारांना हक्काचे स्वस्त धान्य मिळावे, यासह त्यांची नोंदणी होऊन त्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, आदींसाठी पुढाकार घेतला जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा भोसले, मनिषा तोकले, तत्त्वशील कांबळे, अशोक तांगडे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here