शिरापूर पाठोपाठ सराटेवडगांव येथील मधील १०० कोंबड्या व २ कावळे मृत

कोंबड्या

शिरापूर पाठोपाठ सराटेवडगांव येथील मधील १०० कोंबड्या व २ कावळे मृत

कोंबड्या

in article

आष्टी दि 17 जानेवारी, प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील शिरापूर पाठोपाठ सराटेवडगांव येथील शेतकऱ्यांच्या आणि पोल्ट्रीफार्म मधील १०० कोंबड्या व २ कावळे मृत झाल्याचे पुढे आले.पशुवैद्यकीय पथकाने या भागाची पाहणी केली असून नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

पशुवैद्यकीय पथकाने सराटे वडगाव येथे भेट दिली असता १६ कोंबड्या मृत आढळून आल्या असून सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
आष्टी तालुक्यातील सराटेवडगांव येथे दि.१६ रोजी एक तर दि.१७ रोजी एक असे एकूण २ कावळे मृत झाल्याची घटना घडली.तर रावसाहेब मल्हारी गजघाट यांच्या पोल्ट्री मधील १६ कोंबड्या मरण पावल्या आहेत.बापुराव गायकवाड यांच्या पोल्ट्रीतील १० ते १२ कोंबड्या अचानक मरण पावल्या असल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.या मृत कोंबड्यांचे सॅम्पल तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. पशुवैद्यकीय पथकाचे डॉ.एस.के.गदादे,डाॅ.एस.डी.शिंदे,सहाय्यक परिचर वांढेकर,सहाय्यक परिचर चौधरी या टीमसह गावचे सरपंच राम बोडखे यांनी पाहणी आणि पंचनामा केला.
सरपंच राम बोडखे यांनी सांगितले की,”गावामध्ये मागिल आठ दिवसांपासून कोंबड्यांचा मृत्यू होत आहे.दि.१६ व १७ रोजी प्रत्येक एक एक म्हणजे २ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे.गावातील शेतकरी व पोल्ट्री फार्म मधील जवळपास १०० पेक्षा जास्त पक्षी मृत झाले आहेत”.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.एस.के.शिंदे यांनी सांगितले की ,”सराटेवडगांव येथील शेतकरी रावसाहेब गजघाट यांच्या पोल्ट्री मधील १६ कोंबड्या मृत आढळून आल्या असून या कोंबड्यांचे सॅम्पल प्रादेशिक रोग प्रयोगशाळा पुणे येथे पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल”

हेही वाचा:27 जानेवारी पासून 5 ते 8 च्या शाळा सुरू होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here