व्यावसायिकांची ऑक्सिजन सिलेंडर ची कोविड सेंटरला मदत

ऑक्सिजन सिलेंडर

कडा, प्रतिनिधी

गॅस वेल्डिंगचा स्वतःचा व्यवसाय बंद ठेवत लोकांचे प्राण वाचावेत यासाठी कडा येथील फॅब्रिकेशन व्यावसायिकांनी आपल्याकडील ऑक्सिजन सिलेंडर कोविड सेंटरला दिले आहेत.
आष्टी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ही इतर तालुक्यांप्रमाणे जास्त आहे . दवाखान्यात उपचार घेत असणाऱ्या रुग्णांना बऱ्याचदा ऑक्सिजनची गरज पडते . तालुक्यात एक शासकीय तर तीन खाजगी कोविड सेंटर सुरू आहे . ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कोरोनामध्ये खूप असू शकते . एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन द्यायची गरज पडली तर तो द्यायचा कोठून हा प्रशासनासमोर मोठा पेच होता . पण तालुक्यातील फॅब्रिकेशन व्यावसायिकांनी तो सोडवण्यास मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला . कडा येथील संतोष ओव्हाळ , जयंत देशमुख , अनिल पांडुळे , वासुदेव यादव , महेश सांगळे , चव्हाण , अंबिलवादे बंधू आणि इतरांनी सुमारे २५ सिलेंडर उपलब्ध करून दिले . त्याचा अनेक रुग्णांना फायदा होत आहे . तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्या आवाहन प्रतिसाद देत अनिश्चित कालावधीसाठी त्यांनी आपापले सिलेंडर जमा केले आहेत .

in article

ऑक्सिजन सिलेंडर

आमच्या औद्योगिक व्यवसायात ऑक्सिजन सिलेंडरचे महत्व अनन्य साधारण आहे . पण सध्याचा काळ बघता आमच्या व्यवसायापेक्षा लोकांचे जीव वाचणे आम्हाला महत्त्वाचे वाटले म्हणून आम्ही त्यांनी आवाहन करताच ते कोविड सेंटरला दिले

संतोष ओव्हाळ , फॅब्रिकेशन व्यावसायिक , कडा

आणखी वाचा:चार दिवसात उभारले १०० बेडचे रुग्णालय

 

शेती अवजार निर्मिती व्यवसायात गॅस कटर म्हणून ऑक्सिजनचा उपयोग होतो . येणारा काळ शेतीसाठी महत्त्वाचा असला तरी माणुसकी मोठी आहे . त्यामुळेच आम्ही हे सिलेंडर ज्यांना गरज भासते अशा सर्वांना मोफत दिले .

जयंत देशमुख , जयप्रभा इंजिनिअरिंग , शेरी बुद्रुक ता आष्टी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here