U19 Boys World Volleyball Championship 2021 कामगिरी

U19 Boys World Volleyball Championship 2021

U19 Boys World Volleyball Championship 2021
प्रथमच पात्र ठरलेल्या भारतीय संघाची सर्वोत्तम कामगिरी

गौरव डेंगळे
तेहरान (ईरान) : जागतिक व्हॉलीबॉल फेडरेशन अंतर्गत U19 Boys World Volleyball Championship 2021 बॉईज वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या झालेल्या अंतिम सामन्यात २०१५ चा विजेता पोलंड संघाने बल्गेरियाचा सरळ सेटमध्ये २५-२०,२५-१९ व २५-१९ ने पराभव करून दुसऱ्यांदा व्हॉलीबॉल चॅम्पियनशिपचे सुवर्णपदक पटकावले.

in article

जागतिक व्हॉलीबॉल स्पर्धेत भारताने प्रथमच आपले स्थान निश्चित केले होते. जागतिक क्रमवारीत ४९ व्या स्थानी असणारा भारतीय संघाला स्पर्धेच्या तयारीसाठी कमी कालावधी मिळाला तरीदेखील भारतीय संघाने आपली सर्वोत्तम कामगिरी करत,२० संघांच्या या स्पर्धेत १० क्रमांक पटकाविला.

U19 Boys World Volleyball Championship 2021 सुवर्णपदक विजेता पोलंड,कास्यपदक विजेता इराण,

नायजेरिया,गुअतेमाला या संघानं समवेत भारताचा ‘अ’ गटात समावेश होता.साखळीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या नायजेरिया संघाचा भारताने पराभव केला.साखळीतील २ विजयासह भारतीय संघाने बाद फेरीत प्रवेश केला. .

ब्राझील कडून पराभव पत्करल्यानंतर भारताने क्रमांक ९ ते १६ स्थानासाठी झालेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत १८ स्थानी असलेल्या क्युबाचा ३-० ने तर जागतिक क्रमवारीत ४ स्थानी असलेल्या इजिप्तचा ३-२ ने पराभव केला. ९व्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात चेक रिपब्लिक संघाने भारताचा पराभव केला.

आणखी वाचा : निळवंडे धरणाच्या कालव्याचे अपूर्ण काम पूर्ण करावे या मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा

प्रथमच संधी मिळालेल्या भारतीय व्हॉलीबॉल संघाने या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत १० क्रमांक पटकाविला. जागतिक व्हॉलिबॉल स्पर्धेत सुवर्णपदक पोलांड संघाने रोप्यपदक बल्गेरिया संघाने तर कास्यपदक यजमान इराण संघाने पटकावले.
भारतीय संघाकडून या स्पर्धेत अमन कुमार,अजय कुमार,तनिष चौधरी,समीर चौधरी आदी खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

स्पर्धेत यशस्वी कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचे आशियाई व्हॉलीबॉल कॉनफेडरेशनचे विभागीय सचिव श्री रामावतार सिंग जाखड,व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ अच्युता सामंता, सचिव श्री अनिल चौधरी, महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे आश्रयदाते श्री अविनाश आदिक, अध्यक्ष श्री पार्थ दोषी, सर्व पदाधिकारी भारतीय व्हॉलिबॉल महासंघ व महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना आदींनी अभिनंदन केले व संघाला शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा: Royal Enfield 350 नवी बाईक बाजारात 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here