Tokyo Olympics 2021:41 वर्षानंतर पहिल्यांदा भारताला हॉकी मध्ये ऑलिम्पिक पदक

Tokyo Olympics 2021

टोकियो- प्रतिनिधी

Tokyo Olympics 2021 गेल्या अनेक वर्षांपासून ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताची कामगिरी ढासळत होती. हॉकी मध्ये  41  वर्षांपासून पहिल्यांदा भारताला हॉकी खेळात पदक मिळाले असून खेळाडूंच्या अथक प्रयत्नांमधून हे साकार होत आहे.

भारताने हॉकीमध्ये ऑलिम्पिक पदक 1980 मध्ये शेवटच्या वेळी जिंकले, 41 वर्षांनंतर मनप्रीत अँड कंपनीने हॉकीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकून इतिहास रचला आहे.  भारताने जर्मनीचा  5-3  असा पराभव करत कांस्यपदकावर दावा केला.

in article

हॉकीतील भारताचे हे 12 वे ऑलिम्पिक पदक आहे. भारताने यापूर्वी हॉकीमध्ये आठ सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. पहिल्या क्वार्टरमध्ये 0-1 ने बरोबरीत सुटल्यानंतर भारतीय संघ परत आला. उपांत्य फेरीच्या सामन्यात बेल्जियमविरुद्ध झालेल्या चुकांमधून धडा घेत भारतीय संघाने या सामन्यात चांगली कामगिरी केली. भारताकडून सिमरनजीत सिंगने दोन गोल केले, तर हरमनप्रीत सिंग, हार्दिक सिंग आणि रुपिंदर पाल सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला.

अखेर राज्यातील पशुचिकित्सा संघटनेच्या आंदोलनाला यश-डॉ. विष्णु साबळे

भारतीय पुरुष हॉकी संघाने गुरुवारी टोकियो Tokyo Olympics 2021 येथे झालेल्या स्पध्रेत चकमकीत जर्मनीचा 5-4 असा पराभव करून ऑलिम्पिक पदक मिळवले. रुपिंदर पाल सिंग, हार्दिक सिंह आणि हरमनप्रीत सिंग यांच्या गोलने प्रेक्षकांचे पारणे फेडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here