पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या अतिदुर्मिळ कस्तुरी मांजर

कस्तुरी मांजर

पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या अतिदुर्मिळ कस्तुरी मांजराला जीवदान

कडा

in article

जगातील अतिसंकटग्रस्त प्रजातींच्या ‘रेड लिस्ट’मधील हा दुर्मिळ प्राणी कस्तुरी मांजर, स्मॉल इंडियन सिव्हेट या मांजराला विहिरीतून काढून अधिवासात सोडण्यात आले.

कस्तुरी मांजर
आशिया व आफ्रिका खंड परिसरातील काही दुर्गम भागात आढळणारा सध्या नामशेष होणारा हा प्राणी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात आढळून आला.

आष्टी तालुक्यातील केरुळ येथील गणेश आडकर यांच्या शेतातील सहा ते सात परस असलेल्या कोरड्या विहिरीत दहा दिवसांपूर्वी एक दुर्मिळ प्राणी पडलेले होते.

शिवा‌ जमदाडे हे खरबुज आणण्यासाठी आडकर यांच्या शेतात गेले होते. त्यावेळी विहिरीत वन्य प्राणी पडल्याचे त्याच्यां निदर्शनास आले. त्यांनी पशुधन अधिकारी मनोजकुमार खेडकर यांना कळवले.

त्यांनी या संपूर्ण घटनेची माहिती फोनवरून कडा येथील प्राणिमित्र नितीन आळकुटे यांच्या कानावर घातली घटनेची माहिती मिळताच , प्राणीमित्र तात्काळ मित्रांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली.

त्या ठिकाणी जाऊन प्राण्याची पाहणी केली असता दुर्मिळ कस्तुरी मांजर असल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शाम सिरसाट यांना कळवले.

लगेचच धोकादायक असलेल्या कोरड्या विहिरीत प्राणिमित्र नितीन आळकुटे हे जीवाची परवा न करता दोरीच्या सहाय्याने विहिरीत खाली उतरले. भुकेने व्याकूळ झालेला हा प्राणि आक्रमकता दाखवत होता पोटाची खळगी शांत करण्यासाठी तिला प्रथम खाण्यास दिले,चतुराईने त्याला पकडून पोत्यात टाकुन सुखरूप बाहेर काढले.

या दरम्यान मदतीला गणेश पवळ,दिपक पवळ, अक्षय भंडारी,दिपक घोडके,विशाल राजगुरू, डॉ.मनोजकुमार खेडकर व वनविभागाचे कर्मचारी अनिल मालेवार ,एन.के.काकडे ,बी.पी.मोहळकर व इतरांनी सहकार्य केले त्या प्राण्याला लगेचच टेंभीच्या वनात सुखरूप सोडण्यात आले.

कस्तुरी मांजर भक्ष्य मिळविण्याकरिता रात्री बाहेर येतात.लहान पक्षी,घुशी,खारी, सरडे,लहान किडे, या सारखे प्राणी तर वनस्पतीत मुळे,फळे असे खाद्य त्यांच्या आहारात असतात .

जागतिक प्रजातींच्या ‘रेड लिस्ट’मध्ये अतिदुर्मिळ प्राणी म्हणून घोषित आहे, सध्या वृक्षतोड,शिकार,वनवे पेटवणे या मुळे अनेक जीव जंतू प्राणी, यांचे वंशचे वंश निसर्गातुन कायमचेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत हे वाचवणं आता आपलं कर्तव्य आहे.

निसर्गातील कुठलाही प्रजातीचे प्राणि,पक्षी संकटात सापडले तर त्यांना संकटातून बाहेर काढा अथवा वनविभाग व प्राणिमित्रांना कळवित चला माणुस म्हणून हे सत्कर्म करावी असे आवाहन आळकुटे याने केले आहे.

आणखी वाचा:खासदार विखे यांच्या रेमेडिसीवीयर प्रकरणात कोर्टाने काय म्हटले?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here