बीड जिल्ह्यात 1 ते 7 च्या शाळा सोमवारपासून सुरु

School reopens
School reopens

बीड जिल्ह्यात 1 ते 7 च्या शाळा सोमवारपासून सुरु

 

in article

बीड

School reopens बीड जिल्ह्यातील शाळा  ८ वी पासून पुढे सुरु झाल्यानंतर इयत्ता 1 ली ते 7 पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी घेतला असून सोमवार पासून ह्या शाळा सुरु होणार आहेत.

 

गेल्या अनेक दिवसापासून शाळेचा पाठशिवणीचा खेळ सुरु आहे. आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी 1 ली ते 7 पर्यंत चे वर्ग सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

School reopens

यापूर्वी इयत्ता १० आणि १२ वीचे वर्ग सुरु करण्यास  २४ जानेवारी रोजी परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसापूर्वी इयत्ता ८ वी, 9 वी आणि 11 वी चे वर्ग सुरु करण्यात आले. आता बालकांचा किलबिलाट शाळेत पहावयास मिळणार आहे. जिल्ह्यातील शाळा पुन्हा गजबजणार आहेत. School reopens  त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा सुरु असणार असल्याचे  जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सांगितले आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here