बीड जिल्ह्यातील एकूण 87 मंडळात 25% अग्रीम पीकविमा मंजूर

कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या सुचनेचे बीड जिल्हा प्रशासनाकडून तंतोतंत पालन

जिल्ह्यातील एकूण 87 मंडळात 25% अग्रीम पीकविमा मंजूर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी काढली अधिसूचना

in article

सोयाबीन, मूग व उडीद पिकांचा समावेश

शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत

बीड

pikvima advance beed राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी संभाजीनगर येथे मराठवाड्यातील दुष्काळ सदस्य परिस्थितीच्या आढाव्यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांना दिलेल्या आदेशाचे बीड जिल्हा प्रशासनाने तंतोतंत पालन केले असून, बीड जिल्ह्यातील सर्व 87 महसुली मंडळांमध्ये अग्रीम पीकविमा देण्याचे मान्य करत संबंधित पीकविमा कंपनीस अग्रीम तातडीने वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.

pikvima advance beed

बीड जिल्ह्यातील विशेषतः सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत पावसात दीर्घकालीन खंड पडल्यामुळे शेतकरी संकटात आले आहेत. बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये पावसाच्या खंडाने दुष्काळ सदस्य परिस्थिती असल्यामुळे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने अंतरिम दिलासा म्हणून शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मिळवून देण्यासाठी सात दिवसांच्या आत महसूल, कृषी व पिक विमा कंपनीने एकत्रित सर्वे करून अहवाल सादर करावा व अग्रीमे विमा देण्याचे निर्णय घ्यावा असे निर्देश दिले होते.

20230831 120252

Pick Bima 72 hour condition is mandatory if canceled पिक विमा 72 तासाची अट रद्द की बंधनकारक

त्यानुसार बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी आज अधिसूचना निर्गमित केली असून महसूल, कृषी व पिक विमा कंपनीने निर्देशित केलेल्या सर्व 87 महसुली मंडळांमध्ये सोयाबीन, उडीद व मूग या पिकांचे सर्वेक्षण करावे, या सर्व महसुली मंडळांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे संभाव्य नुकसान हे सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा अधिक असल्याने निकषानुसार ही सर्वच्या सर्व महसूल मंडळे अग्रीम पीक विम्यास पात्र आहेत व या सर्व महसूल मंडळांमध्ये तातडीने अग्रीम पीक विमा देण्यात यावा, अशा पद्धतीचे आदेश आज निर्गमित केले आहेत.

pikvima advance beed
pikvima advance beed

धनंजय मुंडे यांच्या या तातडीच्या निर्णयामुळे 87 महसूल मंडळातील सोयाबीन, मूग व उडीद उत्पादक शेतकऱ्यांना 25% अग्रीम विमा एक महिन्याच्या आत मिळेल, हे आता निश्चित झाले असून, या कठीण काळात हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here