मी येतेय… तुम्ही पण या दसरा मेळाव्याला ….

pankaja munde dasra melawa
pankaja munde dasra melawa

 

आष्टी,

in article

 

 

pankaja munde dasra melawa दरवर्षी प्रमाणे यंदाही भगवानभक्ती गडावर भगवान बाबा भक्तांची मांदियाळी फुलणार आहे. या साठीची तयारी पूर्ण झाली असून यंदा अडीच लाख या गडावर येणार असल्याचे बोलले जात आहे.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी दसरा मेळावा घेण्याची परंपरा सुरु केली. सुरुवातीला हा मेळावा भगवानगड येथे आयोजित केला जात असे. मात्र भगवान बाबा यांच्या जन्म गावी या मेळाव्याची प्रथा माजी मंत्री मुंडे कन्या पंकजा मुंडे यांनी सुरु केली. त्यासाठी येथे भव्य असा भगवानबाबा bhagwan baba यांचा पाण्यावर बसलेल्या स्थितीतला पुतळा उभारण्यात आला आहे.

त्याला वंदन करण्यासाठी भगवानबाबा भक्त या ठिकाणी येतात. या मेळाव्याचे निमंत्रण नुकतेच सावरगाव ग्रामस्थांनी पंकजा मुंडे यांना दिले असल्याची माहिती सावरगावचे सरपंच संदेश सानप यांनी दिली.

 

या मेळाव्यासाठी प्रशासनाची परवांगी मिळाली असून भाविकांच्या सोयीसाठी पाच रुग्ण वाहिका तसेच पाण्याचे फिल्टर याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी दोन हेलिकॉप्टर साठी हेलिपॅड उभारण्यात आले आहेत.

अठरा एकर जागेत हा मेळावा पार पडत आहे .राज्यात होणाऱ्या नेत्यांच्या दसरा मेलाव्याप्रमाणे या मेळाव्याकडे राजकीय आणि सामाजिक धुरीनानंचे लक्ष लागलेले असते. राज्यात सध्या  मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण, कंत्राटी धोरण यामुळे अस्वस्थता आहे.

राजकीय अस्वस्थता दूर करण्यासाठी त्यांनी नुकतीच शिव शक्ती परिक्रमा करत राज्यातील समर्थकांच्या भेटी घेतल्या. त्यांचे मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले होते . त्यामुळे काही काळ राजकीय अस्वस्थता निर्माण झाली होती.

त्यातच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला gst विभागाने 19 कोटी थकविल्याप्रकरणी नोटीस देण्यात आली होती. त्यावर पंकजा मुंडे यांना मदत करण्यासाठी सर्व समाज एकवटला होता .मदतीचा ओघ सुरु झाला होता. मात्र पंकजा मुंडे यांनी ही मदत घेण्याचे नाकारले. त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना भक्तांचा भावनिक पाठींबा मिळाला. यामुळे राजकीय अवस्थता निर्माण झाली आहे .

त्यातच आता दसरा मेळावा जवळ आल्याने हे वातावरण अधिक तापले आहे. नुकताच मराठा आरक्षण साठी मराठा समाज अंतरवली येथे एकवटला होता. त्याचीच रेघ आता पुढे ओढून pankaja munde news पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याकडे पहिले जात आहे.

पंकजा मुंडे यांचे हे भाविकांना संबोधित करण्याचे व्यासपीठ असल्याने आता त्या या व्यासपीठावरून काय आवाहन करणार हे दिसणार आहे. एकूणच त्यांच्या राजकीय विजनवास आणि कारखान्यावरील कारवाई आणि समाजातून मिळणारा पाठींबा यासाठी हा मेळावा महत्वाचा मानला जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here