Old pension scheme जुनी पेन्शन योजनेसंदर्भात काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Old pension scheme जुनी पेन्शन योजनेसंदर्भात काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर

in article

Old pension scheme कोणत्याही परिस्थितीत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार नाही असा ठाम निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जाहीर केला, शाळांना अनुदान देण्याबाबतचा प्रश्न चर्चेत असताना या उप प्रश्नावर त्यांनी हे स्पष्ट केलं.
जुनी पेन्शन योजना २००५साली बंद झाली आहे, ती पुन्हा लागू केली तर राज्यावर एक लाख दहा हजार कोटींचा बोजा पडेल आणि राज्य पूर्ण कोलमडून पडेल असं ते म्हणाले. अनुदानित शाळांची मूळ संख्या ३५० होती ती आता ३९०० झाली आहे असंही त्यांनी सांगितलं.

यापुढे कोणत्याही अनुदानित शाळेला मंजुरी देण्यात येणार नाही, केवळ स्वयं अर्थसहाय्यित शाळांना परवानगी दिली जाईल मात्र त्यावर ही नियंत्रण ठेवलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या मूळ प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here