तीन दिवसीय मायंबा मच्छिंद्रनाथ यात्रोत्सवास प्रारंभ

machhindranath temple
machhindranath temple

तीन दिवसीय मायंबा यात्रोत्सव

आष्टी

in article

machhindranath temple   श्रीक्षेत्र मायंबा तालुका आष्टी येथील मच्छिंद्रनाथ देवस्थानचा तीन दिवसीय यात्रोत्सवास प्रारंभ झाला. सकाळी सावरगाव येथे  कोठी मिरवणुकीने झाला. आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब म्हस्के , सचिव बाबासाहेब म्हस्के यांनी दिली.

या यात्रोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

संपूर्ण गावभर  मिरवणुकीतून जमा झालेला शिध्याचे कोठी मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली.  कोठी मिरवणूकचे मायंबा गडाकडे प्रस्थान् झाले. (machhindranath mandir)

या नाथांच्या समाधीला वर्षातून एकदाच हात लावून घेता येते दर्शन!

शुक्रवारी नवनाथ भक्त मंडळाच्या वतीने विशाल स्वरुपात भंडाऱ्याचे आयोजन केले आहे. देवतलाव जवळ संकलित शिघ्याचा नैवेद्य करून मिरवणुकीने आणून दुपारनंतर देवतांना भोग अर्पण केला जाईल. सायंकाळी सावरगाव येथे छबिना मिरवणूक ८ ते ११ दरम्यान होईल.

शनिवारी (दि.१०) कलावंत हजेऱ्या व राज्यातील नामवंत मल्लांचा कुस्त्यांचा हंगामा होईल. यावर्षी प्रथमच वजन वयोगटानुसारच कुस्त्या लावल्या जाणार आहेत. रविवारी धर्मनाथ बीज होईल. महाप्रसाद होऊन यात्रोत्सवाची सांगता होईल.
सावरगाव, शेंडगेवाडी ग्रामस्थांच्या वतीने यात्रा उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. यात्रा उत्सव काळातील धार्मिक पूजाविधी उपक्रम अन्नप्रसाद सेवेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच शशिकला चंदनशिव, नवनाथ म्हस्के यांनी विश्वस्त मंडळाच्या वतीने केले आहे.(machhindranath maharaj)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here