कोतवालांच्या मानधनात दुप्पटीने वाढ

kotwal
kotwal

 

राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता

in article

कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार होणार; १२,७९३ कोतवालांना फायदा होणार
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील

मुंबई,

kotwal राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. राज्यातील कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

लेक लाडकी योजना government yojana 2023

राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीबाबत मा. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२३ रोजी राज्याचा सन २०२३-२४ अर्थसंकल्प सादर करतांना अर्थसंकल्पीय भाषणाच्यावेळी केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीच्या सादर केलेल्या प्रस्तावास मा. मंत्रिमंडळाने दिनांक १७ मार्च, २०२३ च्या बैठकीत मान्यता दिलेली आहे.

त्यानुसार सध्या सेवा कालावधीनुसार कोतवालांना मिळत असलेले मानधन ७ हजार ५०० रुपयावरून १५ हजार करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व १२,७९३ कोतवालांना यापुढे दरमहा सरसकट १५ हजार इतके मानधन लागू करण्यात आले आहे. १५ हजार रुपये इतके मानधन दि. ०१ एप्रिल २०२३ पासून अनुज्ञेय असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here