केंद्र सरकारच्या शेती कायद्यामुळे तालुक्यातील शेतकरी खुश ….

4
506
 भरीतकर

अकोले /शांताराम काळे

केंद्र सरकारच्या शेती कायद्यामुळे तालुक्यातील शेतकरी खुश असल्याचे येथील राजाराम रामनाथ  भरीतकर यांनी घेतलेल्या शेतीच्या उत्पादनातून दिसून येत आहे.त्यांनी उत्तम व्यवस्थापनातून मिरची पिकात हातखंडा तयार केला आहे.

in article

दरवर्षी जुलैमध्ये लागवड असलेल्या मिरचीचे तीन संकरीत वाण घेत एकरी ३५  ते ४० टन उत्पादीत या मिरचीला त्यांनी जागेवरच मार्केटही मिळवले आहे.केंद्र सरकारच्या करार व हमी भाव योजनेतून त्यांनी प्रथम ८ शेतकरी एकत्र केले व आज २०० शेतकऱ्यांचे गट स्थापन करून शेतकरी कंपनी स्थापन करून आपली मिरची नाशिकचे भालचंद्र पाटील यांच्या माध्यमातून  युरोप मध्ये पाठवित आहे .हमी व करार माध्यमातून ५०० शेतकरी एकत्र करण्याचा त्यांचा विचार आहे. .त्यांचे शिक्षण १२ वी झाले असून दहावीत असल्यापासून त्यांना शेतीची आवड निर्माण झाली त्यातून दोन एकर शेती आपल्या जिद्द , चिकाटी मेहनतीतून आज त्य्नच्याकडे साडेचार एकर शेत जमीन असून सर्व शेतीला त्यांनी ओलिताखाली आणले आहे . उस , बटाटे , कांदे ,टोमाटो , पपई ,नारळ , लिंब ,चिकू , पेरू ,कलिंगड  सीताफळ ,टरबूज , शेळीपालन ,माध्यमातून वर्षाला  खर्च वजा जाऊन नेट पाच लाख  त्यांच्या  हातात पडतात या कामात त्यांची पत्नी सौ . योगिता मुलगा महेश भरीतकर  मदत करतात

 भरीतकर

समशेरपूर  हे गाव सांगवी , पाडोशी जलाशय  व आढळा  नदीनजीक आहे. येथील जमीन काळी कसदार आहे.. पाण्याचे दुर्भिक्ष्य उन्हाळ्यात अनेकदा जाणवते. टोमाटो, मिरची व पपई ही या भागातील प्रमुख नगदी पिके आहेत. गावातील राजाराम भरीतकर यांची वडिलोपार्जीत दोन व स्वत घेतलेली अडीच एकर असे साडेचार  एकर शेती आहे. दोन कूपनलिका आहेत. पाणी कमी पडत असल्याने मागील दोन वर्षापूर्वी नदीवरून जलवाहिनी टाकून पाण्याचा शाश्‍वत स्त्रोत त्यांनी निर्माण केला. वडील रामनाथ भरीतकर  देखील पूर्णवेळ शेतकरी असून त्यांचे मार्गदर्शन  राजाराम यांना मिळते.

हेही वाचा:कळसुबाई – हरिश्चंद्र गड परिसरात १०० बंधारे

मिरचीची शेती
भरीतकर यांचा मिरची पिकात सुमारे पाच वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. दरवर्षी जुलैमध्ये लागवड असते. लागवडीपूर्वी जमीन चांगली तापू देतात. त्यात एकरी चार ट्रॉली शेणखत देतात. पाच बाय सव्वाफूट अंतरात दीड फूट उंचीच्या गादीवाफ्यावर पॉली मल्चिंग तंत्राचा उपयोग करून लागवड होते. सिंचनासाठी ठिबकची व्यवस्था आहे. निविष्ठाबाबत दिलीप बेनके यांचे मार्ग दर्शन मिळते. खते व फवारणीसंबंधीचे वेळापत्रक तयार करून घेतले आहे. मिनी ट्रॅक्‍टरद्वारे आंतरमशागत होते. बोअरच्या पाण्याची व्यवस्था आहे. तसेच कृषी विभागाकडून शेततळे घेतले आहे सुमारे ८० लाख लिटर त्यात  पाणी  आहे .

 भरीतकर

तीन प्रकारच्या वाणांची निवड
भरीतकर दरवर्षी तीन प्रकारच्या वाणांची निवड करतात. त्यातील एक वाण मिझोरम  हिरवी, पिवळी  व लाल मिरची यासाठी वापरता येते. दुसरा वाण निर्यातीच्या दृष्टीने व अधिक टिकण्यासाठी फायदेशीर ठरतो. तर तिसरा वाण निर्यात व स्थानिक अशा दोन्ही बाजारपेठांसाठी उपयोगी ठरतो. यात तिखट, आखूड, जाड, मध्यम, तिखट असाही वाणांचा विचार असतो. रोपे नाशिक येथील नर्सरीतून एक रुपये २० पैसे प्रतिरोप या दराने खरेदी होतात. एकरी सहा हजार रोपे लागतात.

उत्पादन व विक्री
मिरचीचा प्लॉट मार्चपर्यंत चालतो. एकरी ३८ ते ४० क्विंटलपर्यंत उत्पादन  भरीतकर घेतात.
यंदा डिसेंबरच्या मध्यात हिरव्या मिरचीची काढणी बंद केली. लाल, पिवळी  झाल्यानंतर विकण्याचा मानस आहे. त्याची विक्री नाशिक येथील प्याक हाउस चे मालक भालचंद्र पाटील यांचेकडे करार केला असून हिरवी ३५ रुपये तर लाल पिवळी ४० रुपये हमी भावाने देणार असल्याचे भरीतकर म्हणाले . काढणीसाठी स्थानिक मजूर ३०० रुपये रोजाने घेतले जातात दोन एकरांत काढणीसाठी सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत दर १० दिवसाआड २०  ते २५ मजुरांची आवश्‍यकता असते.  भरीतकर  यांच्या दर्जेदार मिरचीची खरेदी नाशिक येथील खरेदीदार जागेवरच करतात. पुढे ही मिरची नाशिक व तेथून युरोप  देशांत ती निर्यात होते.
दरवर्षी निर्यातक्षम मिरचीला किलोला ३५  रुपये, काहीवेळेस ४०  रुपये तर स्थानिक मिरचीला त्याहून कमी किंवा २५    रुपयांपर्यंत दर मिळतो. दरवर्षी खर्च  वजा जाता  चार   लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. त्यांचे शेतकरी मित्र युसूफ शेख यांची सतत त्यांना मदत होते

पपई, मिरची , –राजाराम भरीतकर यांचे शिक्षण १२ वी झाले आहे सतरा वर्षा पासून शेती करत आहे . पूर्वी पारंपारिक शेती करत होते नंतर ते सेंद्रिय शेतीकडे वळले , भाजीपाला करू लागले ,टोमाटो , फळबाग लागवड केली  त्यात  त्यांना चांगले  पैसे मिळू लागले. तर एका एकरात त्यांनी ५०० झाडे लावली असून मग त्यांनी मिझोरम मिरचीचे रोपण केले  व केंद्रसरकारच्या संकल्पनेतून करार शेती करून हमी भाव घेतल्याने त्यांना त्यात चांगला भाव मिळू लागला आहे . लाल पिवळी क्रोस बोनट ढोबळी मिरची  , हारू नारू पिवळी ,एफवनडेमन या तीन जातीच्या मिरच्या लावल्या आहेत .कृषी योजनेतून  १० गुंठे जमिनीवर   शेड नेट हाउस उभारले असून त्यात ढोबळी सिमला मिरची करण्यात आली आहे . तर ड्रीप ने पाणी देण्यात येते त्यंचे शेड नेटला तीन लाख रुपये खर्च आला तो त्यांनी फेडला असून , ठिबक सिंचन वर  ३५ गुंठे जागेत उस लागवड केली आहे .तर सीताफळ , कलिंगड , पेरू , काकडी , सोबतीला शेळी पालन ते करत आहे १५ शेळ्या १० बकरे असे त्य्नच्याकडे आहे तर डांगी गाय , हॉस्टन गाय , कालवड असून दुध धंद्यात त्यांना उतरायचे आहे . त्यंच्या पपई ला बांधावर ग्राहक मिळतात . नाशिक बाजारपेठेत त्यांच्या सीताफळ , पेरू , कलिंगड याला अधिक मागणी आहे . मध्यंतरी झालेल्या अवकाळी पाऊस झाल्याने योग्य नियोजन असल्यामुळे फारसे नुकसान झाले नाही . प्रत्येक शेतकऱ्याला ते मार्गदर्शन करतात २०० शेतकऱ्यांचा गट करून गट शेती करण्याचा त्यांचा प्रयत्न असून आतापर्यंत १८० शेतकरी त्यंच्या करार पद्धतीत व हमी योजनेत सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

 

Advertisement

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here