बिबट्याने महिलेस पळवले ,महिला ठार

बिबट्याने महिलेस पळवले ,महिला ठार

अकोले,

in article

अकोले तालुक्यातील कोकणेवाडी ठाकर वस्तीवर शेळ्या बांधलेल्या पडवीत झोपलेली असताना  अपंग महिलेस पहाटे चार वाजता बिबट्याने आपल्या जबड्यात पकडुन जंगलात नेऊन ठार केले.

रखमाबाई तुकाराम  खडके असे या महिलेचे नाव असून या महिलेच्या भाचे सून हिच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा केला . कोकणे वाडी गावात घटनेचे वृत्त कळताच सकाळी सहा वाजता ग्रामस्थांनी हातात काठ्या घेऊन जंगल शोधले असता रखमाबाई खडके हीचा मृतदेह आढळून आला.पोलीस व वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आहे
<span;>,निळवंडे जलाशय जवळ असलेल्या कोकणेवाडी शिवारात खडके वस्ती जवळ  सुभाष विठ्ठल खडके,नंदा सुभाष खडके,रखमाबाई खडके हे कुटुंब राहते धरणग्रस्त असल्याने एका खडकाळ माळरानावर त्यांनी शेती फुलवली आहे.सोबत दहा शेळ्या ते सांभाळतात दुपारी रखमाबाई शेळ्या शेतात सोडल्या असताना दुपारी चार वाजता बिबट्याने एका शेळीवर झडप मारून शेळी जंगलात ओढून नेली .याबाबत  सुभाष सायंकाळी आल्यावर त्याला समजले पण उद्या सकाळी वनविभागाला कळवू असे म्हणत त्यांनी शेळ्या कोंडल्या व जेवण झाल्यानंतर रखमाबाई शेळ्या बांधलेल्या दारात झोपली पहाटे चार वाजता बिबट्या वस्तीवर आला व त्याने दारात झोपलेल्या रखमाबाई हिस जबड्यात पकडुन तिला ओढत जंगलात नेऊन तिला ठार केले.त्यावेळी नंदा हिच्या आवाज आल्याचे लक्षात येताच तिने बाहेर येऊन पाहिले तर रखमाबाई हिस  बिबट्या ओढत नेत असल्याचे व रखमाबाई ओरडत आहे .तिने सुभाष याला हाक मारली तोपर्यंत बिबट्या जंगलात रखमाबाई हिस ओढत नेताना दिसला तोही घाबरला त्याने कोकणवडी गावात फोन करून ग्रामस्थांना बोलविले व सकाळी सत वाजता महिलेचा मृतदेह छिन्न अवस्थेत दिसला.राजूर वनविभागाचे वनक्षेत्रपाल राजेश्री साळवे सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे,अकोले पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
<span;>अकोले तालुक्यात ऊस क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा उपद्रव वाढला असून या आठवड्यात दहा,शेळ्या,जनावरे,कोंबड्या,यांचा फडशा पाडला असून माणसांवर हल्ले होत असल्याने परिसरातील ग्रामस्थ भयभीत आहे.निळवंडे ते कोकनेवाडी रस्ता संपूर्ण फुटला असून नव्याने रस्ता सुरु करण्यासाठी नारळ फोडून एक वर्ष होऊन गेले मात्र या रस्त्यावर केवळ खडी पडून आहे.त्याबाबत कोणतेही कार्यवाही न झाल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.तर बिबट्या चा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी देविदास कोकने यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here