beed shirur crime news: दिशाभूल करणाऱ्या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

0
29
beed shirur crime news
beed shirur crime news

 

 

in article

बीड

beed shirur crime news गेल्या काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आनंदगांव आणि खांबा लिंबा या दोन गावात एकाच पद्धतीने हत्या झाल्याच्या घटना घडल्या होत्या.

आरोपीने दुसऱ्या व्यक्तींचे नावे लिहून पोलीसांची  दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला . मात्र स्थानिक गुन्हे शाखेने याची उकल करून आरोपीला जेरबंद केले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पोलीस ठाणे शिरुर हद्दीत आनंदगांव शिवारात दिनांक 06/05/2022 रोजीचे मध्यरात्री कुंडलीक सुखदेव विघ्ने वय 65 वर्षे रा. आनंदगांव ता.शिरुर कासार हे त्याचे शेतातील जनवारांचे राखनीसाठी झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन त्यांचे छातीमध्ये धारधार शस्त्राने मारुन खुन केला होता.

तसेच दिनांक 05/05/2022 रोजीचे मध्यरात्री खांबा लिंबा गावाचे शिवारात इसम नामे नारायण गणपती सोनवणे वय 65 वर्षे रा.खांबा लिंबा ता.शिरुर कासार हे त्यांचे राहते घरासमोर झोपलेले असताना झोपेतच त्यांना कोणी तरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचे चेहऱ्यावर धारधार शस्त्राने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

वरील दोन्ही घटनेच्या ठिकाणी दोन-दोन चिठृया मिळून आल्या होत्या. त्यामध्ये आरोपीने पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी दूसऱ्याच इसमांचे नावे टाकून त्यांना अटक न केल्यास खुनाचे सत्र पुढे असेच चालू राहील असे पोलीसांना आव्हान करुन तपासाची दिशा भरकटविण्याचा प्रयत्न केला होता.

beed shirur crime news : चिट्ठीवरून काढला माग

 

परंतू दोन्ही चिठयावरुन दोन्हीही गुन्हे एकाच आरोपीने केल्याची खात्री झाली होती.

सदर दोन्ही घटनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

त्यावरुन पो.नि. स्था.गु.शा.यांनी दोन वेगवेगळे पथके तयार करुन जिल्हयातील व लगतच्या जिल्हयातील वेगवेगळया गुन्हेगारवस्त्या चेक करीत असतांना पो.नि.स्था.गु.शा. यांना गुप्त बातमीदारां मार्फत माहिती मिळाली की, आनंदगांव शिवारातील केलेल्या इसमाचा खुन हा सरकल्या उर्फ भगवान पुस्तक्या चव्हाण रा.तागडगांव शिवार ता.शिरुर कासार याने केला असल्याची खात्रीलायक माहिती मिळालेवरुन स्था.गु.शा.चे दोन पथके त्याचे मागावर असतांना तो बीडकीन ता.पैठण जि.औरंगाबाद भागात गेल्याची माहिती मिळाल्याने त्याचा बीडकीन भागात शोध घेतला.

Beed crime news आरोपींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक

परंतू तेथूनही तो पसार होवून वर्धा जिल्हयात पुजाई गावात गेल्याची माहिती मिळाल्याने दोन्हीही पथके सदर ठिकाणी पुजाई गावाचे शिवारात शोध घेत असतांना त्याला पोलीसांची चाहूल लागल्याने तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना सरकल्या उर्फ भगवान पुस्तक्या चव्हाण यास एक ते दीड किलोमिटर पाठलाग करुन ताब्यात घेतले.

त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे सदर गुन्हयाबाबत विचारपुस केला असता त्याने सदरचे दोन्हीही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यास आज रोजी पोलीस ठाणे, शिरुर कासार गु.र.नं. 50/2022 कलम 302 भादंविमध्ये अटक करुन पुढील तपास पो.नि. पो.स्टे.शिरुर हे करीत आहेत. सदर आरोपी याने सदरचे गुन्हे का केले ? त्याचे साथीदार कोण  आहेत ? गुन्हयात कोणत्या हत्याराचा वापर केला ? अशा विविध बाबींचा तपास सुरु आहे.

beed shirur crime news : सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here