बीड जिल्ह्यातील 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीकविमा

 

 

in article

 

मुंबई,

Beed pin vima agrim राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे. जिल्ह्यातील 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम पीकविमा रक्कम मिळणार आहे! भारतीय पीकविमा कंपनीकडून यासाठी एकूण 241 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात येईल.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात सुरुवातीच्या व मध्य खरीप हंगामात पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने शेतकऱ्यांचे व विशेषकरून सोयाबीन उत्पादकांचे जे नुकसान झाले, त्याचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनास विमा कंपनीला 25 % अग्रीम पीकविमा देण्याच्या अधिसूचना काढायला लावल्या होत्या.

पीकविमा कंपनीने सरसकट विमा देण्यास हरकत घेत आधी विभागीय आयुक्त व नंतर राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे सरसकट विमा देण्यास हरकतीचे अपील केले होते. ते दोन्हीही अपील संबंधित यंत्रणांनी फेटाळून लावले होते.

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विमा कंपन्यांची राज्यव्यापी बैठक घेऊन त्यातही बीड जिल्ह्यात सरसकट अग्रीम विमा देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली होती.

आज अखेरीस भारतीय पीकविमा कंपनीने आपले आक्षेप मागे घेतले असून, जिल्ह्यातील 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट अग्रीम 25% पिकविमा वितरित करण्यात येणार आहे व यासाठी विमा कंपनीने 241 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई रक्कम निश्चित केली आहे.

दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम मिळाला नाही तर आपणही दिवाळी साजरी करणार नाही, अशी भूमिका धंनजय मुंडे यांनी याआधीही जाहीर केली होती, अखेर त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये पण आनंदाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here